आंबी(संदीप पाळंदे) राहुरी तालुक्यातील आंबी, अंमळनेर, दवणगांव, केसापूर या प्रवरा नदी काठावरील गावांना जोडणारा रस्ता मोठमोठे खड्डे पडून अत्यं...
आंबी(संदीप पाळंदे)
राहुरी तालुक्यातील आंबी, अंमळनेर, दवणगांव, केसापूर या प्रवरा नदी काठावरील गावांना जोडणारा रस्ता मोठमोठे खड्डे पडून अत्यंत खराब झाला असून खड्डे रस्तात की रस्ता खड्यात असा प्रश्न प्रवाशांना पडतो आहे. रस्त्याकडेच्या कपारी उघड्या पडल्याने जीव मुठीत घालून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
केशव गोविंद भगवानाचे स्तंभरुपी जागृत देवस्थान, शाळा, महविद्यालय या रस्यावर येत असल्याने भाविकांची, शाळकरी विद्यार्थ्यांची कायम वर्दळ असते. त्यामुळे छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी छोटे अपघात सुद्धा या रस्यावर झालेले आहे. श्रीरामपूर मतदारसंघाचे ‘रोडकरी’ आमदार लहू कानडे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सोनगाव ते चांदेगाव या रस्त्यासाठी पाच कोटी रूपये मंजूर झाले होते. त्यातून आंबी पर्यंत रस्ता पूर्ण झाला आहे. तर शिंदे-फडवणीस सरकारने स्थगिती दिल्यामुळे आंबी ते चांदेगाव हा दुसऱ्या टप्प्यातील रस्ता अर्धवट राहिला आहे. या अर्धवट राहीलेल्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम संबधीत ठेकेदारांनी त्वरीत करावे. अन्यथा आम्हांला आंदोलनाच्या मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशारा अंमळनेर सोसायटीचे माजी चेअरमन उध्दवराव कोळसे, केसापूरचे माजी सरपंच विनायक टाकसाळ, नारायण डुकरे यांचेसह आदि ग्रामस्थ व प्रवाशांनी दिला आहे.
=
कोणत्याही टिप्पण्या नाहीत