बहुचर्चित राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था प्रकरणी तात्कालीन चेअरमन येवले यांना दिलासा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बहुचर्चित राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था प्रकरणी तात्कालीन चेअरमन येवले यांना दिलासा

राहुरी(वेबटीम)       येथील बहुचर्चित राहुरी तालुका राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था अपहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपी...

राहुरी(वेबटीम)



      येथील बहुचर्चित राहुरी तालुका राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था अपहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तात्कालीन चेअरमन भाऊसाहेब येवले यांना तात्पुरता जामीन दिला आहे. एम पी आय डी कायदा भा.द.वि अंतर्गत काही महिण्यापूर्वी राहुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता.

      अहमदनगर  येथील जिल्हा न्यायालयाने भाऊसाहेब येवले यांचा अटपूर्वक जामीन नामंजूर केला होता.तदनंतर औरंगाबाद खंडपीठात ॲड राहुल करपे यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली होती.मा न्यायालयाने ऑडिट रिपोर्ट व इतर तत्सम कागदपत्राचे अवलोकन करून येवले यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे असा आदेश प्राप्त झाला असल्याची माहिती उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे ॲड. राहुल करपे यांनी दिली .या प्रकरणात श्रीरामपूर येथील ॲड. मुकुंद पी गावरे यांनी सहकार्य केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत