राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस निरीक्षक गोपाल चांदेकर यांच्या मोफत ऑनलाइन योगाला प्रतिसाद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस निरीक्षक गोपाल चांदेकर यांच्या मोफत ऑनलाइन योगाला प्रतिसाद

राहुरी(वेबटीम) योग्य वागा निश्चित जगा " हे ब्रीद वाक्य घेवुन " Right To Relax जीवनधारा" या उपक्रमाच्या अनुषंगाने सर्व सामान्य...

राहुरी(वेबटीम)


योग्य वागा निश्चित जगा " हे ब्रीद वाक्य घेवुन " Right To Relax जीवनधारा" या उपक्रमाच्या अनुषंगाने सर्व सामान्य व्यक्तींचे आरोग्य उत्तम राहावे त्यांनी आनंदी जीवन जगावे या साठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक श्री . गोपालजी चांदेकर यांनी Google Meet अॅप वर प्रत्येकाला आपल्या घरीच राहून आपल्या मोबाईलवर ऑनलाईन करता येईल असे सकाळी ६.३० ते ७.४५ या वेळेत दररोज सकाळी व्यायामाचे शिबीर देतात हे विशेष.




अनेक दिवसापासून सुरु केलेले आहे या शिबिरात व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी सूर्यनमस्कारासह विविध प्रकारचे व्यायाम शिकविले जातात व शिबिरातील व्यक्तिंकडून करून घेतले जातात . श्री गोपालजी चांदेकर यांनी पोलीस विभागाचे शारीरिक कसरतीचे प्रशिक्षण घेतलेले असल्याने त्यांच्या या अनुभवाचा उपयोग या शिबिरातील व्यक्तींना होतो . तसेच व्यक्तीची सर्वांगीन प्रगती व्हावी त्याला समाजात मानाचे स्थान मिळावे त्याची अध्यात्मिक उन्नती व्हावी या साठी सुध्दा या शिबिरात मार्गदर्शन केले जाते श्री गोपालजी चांदेकर यांनी अनेक धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे अनेक अध्यात्मिक शिबिरात स्वतः सहभाग घेतलेला आहे . 


त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग ते या समाजहिताच्या कामासाठी करतात . सर्वसामान्य नागरिक शासकीय अधिकारी वर्ग व गृहिणींना हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरत आहे सदर शिबिर दररोज तीन टप्प्यात घेतले जाते शिबिरात 45 मिनिटे व्यायाम दहा मिनिटे सकारात्मक विचारांचे मार्गदर्शन व वीस मिनिटे ध्यान घेतले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक श्री गोपालजी चांदेकर हे आपल्या नोकरीची जबाबदारी व्यवस्थित  सांभाळून हे समाज हिताचे कार्य निशुल्क करत आहेत सकारात्मक विचाराद्वारे व्यक्तीचा जीवनात बदल घडविण्याचे काम यातून केले जाते . या माध्यमातून वेगवेगळ्या ध्यान पद्धत्ती शिकविल्या जातात . सदरील शिबीर हे पूर्णपणे निःशुल्क आहे . दिवसाची सुरुवात योग्य व्यायामाने आणि खळखळून हसून झाल्याने दिवस आनंदी जातो . Google Meet aap वर त्यांच्या या  शिबिरात सहभागी होण्यासाठी मोबाईल क्रमांक ९९ २१२७६०७५  असा आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत