राहुरी फॅक्टरीतील शिवबा प्रतिष्ठाच्यावतीने उद्या मंगळवारपासून भक्ती-शक्ती किर्तन महोत्सव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील शिवबा प्रतिष्ठाच्यावतीने उद्या मंगळवारपासून भक्ती-शक्ती किर्तन महोत्सव

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील शिवबा प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्रीरामपूर रोड वृंदावन कॉलनी लगतच...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)


राहुरी फॅक्टरी येथील शिवबा प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्रीरामपूर रोड वृंदावन कॉलनी लगतच्या मैदानात   मंगळवार १४ फेब्रुवारी ते शनिवार १८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत दरम्यान भक्ती-शक्ती कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले  आहे.


          शिवबा प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात येतो. या भक्ती-शक्ती महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हजेरी लावतात.यंदा मंगळवार १४ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. अंकुश महाराज जगताप (नेवासे), बुधवार १५ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. अशोक महाराज इदगे (आळंदी) गुरुवार  १६ फेब्रुवारी रोजी रोजी ह. भ. प. संजय महाराज कावळे (आळंदी) शुक्रवार  १७ फेब्रुवारी  रोजी ह. भ. प. प्रदीप महाराज नलावडे (सातारा) यांचे किर्तन  होणार असून दररोज किर्तनानंतर हजारो भाविकांच्या प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.



शनिवार १८ फेब्रुवारी रोजी महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांच्या किर्तनाने व महाप्रसाद वाटपाने सांगता होणार आहे.


रविवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० शिवजयंतीनिमित्त भव्य दिव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.


तरी या कार्यक्रमाचा परिरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदीनाथ कराळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत