चिंचविहिरे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.पठारे यांच्यावर ६ सदस्यांचा अविश्वास ठराव दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चिंचविहिरे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.पठारे यांच्यावर ६ सदस्यांचा अविश्वास ठराव दाखल

  राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यात राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या असणाऱ्या चिंचविहिरे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच स्वाती बाबासाहेब पठारे य...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यात राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या असणाऱ्या चिंचविहिरे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच स्वाती बाबासाहेब पठारे यांच्यावर ६ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. 


    तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांच्या उपस्थितीत दि. २ मार्च रोजी सकाळी १०.०० वाजता ग्रा.पं. कार्यालय चिंचविहिरे येथे सदस्यांची विशेष सभा घेण्यात येणार असून यावेळी सदर अविश्वास ठराव संमत होणार की बारगळणार हे समजणार आहे. दि. २४ रोजी चिंचविहिरे ग्रामपंचायतीचे सदस्य सुधीर झांबरे, भगीरथ नरोडे, प्रतिभा गिते, सुवर्णा पानसंबळ, शितल धामोरे, पुष्पा गीते आदि ६ सदस्यांनी सरपंच सौ स्वाती पठारे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. दरम्यान राजकीय दृष्ट्या नेहमी चर्चेत असलेल्या चिंचविहिरे ग्रामपंचायत सरपंचावर अविश्वास ठराव दाखल झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत