रक्तदान करून हिंदवी स्वराज्याचा वारसा वळणकरांनी जपला;संदीप मिटके - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रक्तदान करून हिंदवी स्वराज्याचा वारसा वळणकरांनी जपला;संदीप मिटके

राहुरी(प्रतिनिधी)  "हिंदवी स्वराज्याकरिता मावळ्यांनी रक्त सांडले अन् वळणकरांनी रक्तदान करून खऱ्या अर्थाने स्वराज्याचा वारसा जपला असल्या...

राहुरी(प्रतिनिधी)



 "हिंदवी स्वराज्याकरिता मावळ्यांनी रक्त सांडले अन् वळणकरांनी रक्तदान करून खऱ्या अर्थाने स्वराज्याचा वारसा जपला असल्याचे गौरवोद्गार पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी काढले ते वळण येथे बोलत होते.



       वळण (ता.राहुरी) येथे सालाबाद प्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली कुठलीही बडे-जाव न करता डीजे मुक्त शिवजयंती साजरी करून गावातुन पारंपारिक वाद्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची सवाद्य मिरवणूक पार पडली या मिरवणुकीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, आश्रम शाळेचे विद्यार्थी यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, आबाल वृद्ध तसेच सर्व जाती धर्माचे नागरिक सहभागी झाले होते. येथील हनुमान मंदिराच्या सभागृहामध्ये रक्तदान शिबिर पार पडले.


या शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुने डीवायएसपी संदीप मिटके यांच्या हस्ते करण्यात आले.ते बोलताना म्हणाले की, वळणगावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून विविध कार्यक्रमांमध्ये सामाजिक उपक्रम राबविले जाते हा पायंडा अत्यंत महत्त्वाचा असून तरुणांनी देखील यापुढे सामाजिक उपक्रम राबवूनच महापुरुषांच्या जयंती साजरा कराव्यात. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील तोंडावर असल्याने डीजेचा आवाजाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर देखील मोठा परिणाम होतो म्हणून बहुतांशी गावामध्ये आता डीजे मुक्त जयंती साजरी केली जाते आपल्या गावाने देखील पोलिसांच्या आवाहनाला साथ देऊन डीजे मुक्त जयंती साजरी करण्याचा घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे मिटके यांनी म्हटले आहे.

        प्रसंगी सरपंच सुरेश मकासरे, उपसरपंच लिलाबाई गोसावी, अशोक कुलट,  एकनाथ खुळे, ज्ञानेश्वर खुळे, बी.आर.खुळे, रोहिदास आढाव, रघुनाथ खिलारी, दादासाहेब काळे, मुकींदा काळे, शिवाजी जाधव, पर्वत खुळे, कारभारी खुळे, कुर्बान शेख, शाहिद शेख,जैन्यूद्दिन शेख,रीहान शेख, डाॅ. किशोर म्हसे, विजय आढाव, सहाय्यक फौ.दशरथ कटारे,महेंद्र गुंजाळ, नितीन शिरसाठ, पो.काॅ.औटी,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस काॅ. मनोज गोसावी, काशिनाथ खुळे, संजय आढाव पत्रकार प्रभाकर मकासरे, गोविंद फुणगे, वसंत आढाव, शरद खिलारी, उमेश खिलारी, विक्रम कारले, बाळासाहेब आढाव, भानाभाऊ खुळे, प्रकाश मकासरे,  स्वप्निल चव्हाण,  गौरव खुळे, किरण गडाख, चंद्रशेखर शेळके, अमोल कुलट,दत्ता काळे, रोहिदास रंधे,भीमराज विधाटे, सूत्रसंचालन प्रभाकर मकासरे यांनी केले तर आभार धनंजय आढाव यांनी मानले.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत