सोयीस्कर सत्य सांगण्याची जागा म्हणजे कविता नव्हे- प्रसिद्ध कवी प्रा. डॉ. संतोष पवार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सोयीस्कर सत्य सांगण्याची जागा म्हणजे कविता नव्हे- प्रसिद्ध कवी प्रा. डॉ. संतोष पवार

सात्रळ(वेबटीम) तुमच्या तोंडातून सहजतेने येणारे उद्गार म्हणजे काव्य. कवितेत जीवनानुभवांची संमिश्र लय येते. जिथे कवितेची गोष्ट सांगून होईल, ति...

सात्रळ(वेबटीम)






तुमच्या तोंडातून सहजतेने येणारे उद्गार म्हणजे काव्य. कवितेत जीवनानुभवांची संमिश्र लय येते. जिथे कवितेची गोष्ट सांगून होईल, तिथे कविता संपते. जीवनकहाणी किंवा आत्मचरित्र सांगणे म्हणजे कविता नव्हे. सध्या कवी आणि कवितांचा बाजार भरलेला आहे. मित्रहो लेखणी कोणाची गुलाम नसते. सोयीस्कर सत्य सांगण्याची जागा म्हणजे कविता नव्हे, असे परखड मत प्रसिद्ध कवी प्रा. डॉ. संतोष पद्माकर पवार यांनी व्यक्त केले.

      

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कविता : संकल्पना आणि निर्मिती' या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून कवी पवार बोलत होते. याप्रसंगी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थी कवी संमेलनाचे आयोजन करून कविवर्य कुसुमाग्रज यांची १११ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अहमदनगर जिल्हा बार्टी समन्वय श्री. एजाज पिरजादे, उपप्राचार्या डॉ.  जयश्री सिनगर, उपप्रचार्य डॉ. दीपक घोलप उपस्थित होते.

      अध्यक्षीय सूचना कु. सुनीता नामदेव पोंदे यांनी मांडली. अनुमोदन कु. प्रतीक्षा विठ्ठल गागरे यांनी दिले. प्रास्ताविक समन्वयक व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी केले. कार्यशाळा उद्घाटन व बीजभाषण बेलापूर महाविद्यालयाच्या प्राचार्या कवयित्री प्रो. डॉ. गुंफा कोकाटे यांनी केले. याप्रसंगी हमालकवी श्री. आनंदा साळवे यांनी काव्यगायन करून उपस्थितांची मनी जिंकली.

         विद्यार्थी कवी संमेलनामध्ये कु. पुनम लक्ष्मण गागरे, कु. आरती गावडे, कु. शुभांगी देविदास शिरसाठ, कु. हिना शब्बीर सय्यद, कु. प्रियंका सांबरे तसेच डॉ. अनंत केदारे, प्राचार्य प्रो. डॉ. प्रभाकर डोंगरे यांनीही कविता सादर केल्या. आभार डॉ. गंगाराम वडीतके यांनी मानले. सूत्रसंचालन कु. प्रियंका अंबादास हारदे व कु. प्रतीक्षा विठ्ठल गागरे यांनी केले. 

       कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एफ. वाय. बी. ए. वर्ग प्रतिनिधी निखिल सुरेश अंत्रे, सार्थक संतोष घेर, कृष्णा दत्तात्रय शिंदे, श्रद्धा भाऊसाहेब गागरे, मुबारक पिरमहम्मद सय्यद, स्वप्निल भानुदास वाघचौरे, प्रांजली भागवत मुसमाडे, अमृता तुकाराम ढेपे, रूपाली विलास अल्हाट, निकिता सर्जेराव पवार, सुषमा सुरेश चोखर या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत