राहुरी फॅक्टरी येथील जुने हनुमान मंदिर(बैलगाडी यार्ड, गुंजाळ नाका) हरिनाम सप्ताहास प्रारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील जुने हनुमान मंदिर(बैलगाडी यार्ड, गुंजाळ नाका) हरिनाम सप्ताहास प्रारंभ

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील जुने हनुमान मंदिर(बैलगाडी यार्ड, गुंजाळ नाका) येथे  दि 30 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत रामनवमी ...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील जुने हनुमान मंदिर(बैलगाडी यार्ड, गुंजाळ नाका) येथे  दि 30 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत रामनवमी ते हनुमान जयंतीनिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला.


 यानिमित्ताने भजन, कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण , दोन वेळेस प्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत कीर्तन संपन्न होणार असून 

काल  ३० मार्च रोजी पूजा संभाजी पोखरकर(कोतुळ, अकोले) यांचे कीर्तन पार पडले. आज ३१ मार्च रोजी भागवत महाराज उंबरे(वृद्धेश्वर) यांचे १ एप्रिल रोजी महेश महाराज मडके शास्त्री(नेवासा), २ एप्रिल रोजी  संजय महाराज शिंदे(चांदवड), ३ एप्रिल रोजी पूजा गणेश महाराज गीते(चिंचविहिरे), ४ एप्रिल रोजी आदीनाथ महाराज लाड(आळंदी), ५ एप्रिल रोजी महंत अरुणनाथ गिरी महाराज यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.

गुरुवार ६ एप्रिल रोजी हनुमान जयंती दिवशी ह.भ.प कैलासगिरी महाराज(सावखेडा) यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसाद वाटपाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.


तरि परिसरातील भाविकांनी  ज्ञानामृत व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत