राहुरी फॅक्टरीतील 'या' पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणाने ५१ हजार रुपये केले लंपास - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील 'या' पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणाने ५१ हजार रुपये केले लंपास

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावरील व्यंकटा ऑईल पप्स या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरूणाने पेट्रोल विक्री केले...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)

राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावरील व्यंकटा ऑईल पप्स या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरूणाने पेट्रोल विक्री केलेले सुमारे ५१ हजार रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना दिनांक २८ फेब्रुवारी रोजी घडलीय. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.




अशोक भानुदास सोनवणे(मॅनेजर कम कॅशीयर वय ४२ वर्षे, राहणार गुहा, ता. राहुरी यांनी फिर्याद दिली आहे.


 याच पेट्रोल पंपावर आरोपी गणेश रमेश गोसावी, रा. राहुरी फॅक्टरी हा दि. २४ फेब्रुवारी पासून कामावर आला होता. 




काल दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी गणेश रमेश गोसावी हा देखील कामावर हजर होता. तेथे डिझेल व पेट्रोल वितरीत करण्याची त्याचे काम होते. दुपारी दोन वाजे दरम्यान गणेश गोसावी हा कोणास काही एक न सांगता निघुन गेला. इतर कर्मचाऱ्यांनी त्याला मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मोबाईल बंद होता. 




गणेश गोसावी याची सायं. पाच वाजे पर्यंत वाट पाहीली. परंतू तो कामावर आला नाही. म्हणुन त्याचे राहते घरी जावुन खात्री केली असता तो घरी मिळुन नाही. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तो काम करत असलेल्या ठिकाणी मिटर रिडींग ची पाहणी केली. 




तेव्हा गणेश गोसावी याने दुपारी दोन वाजेपर्यंत डिझेल व पेट्रोल ची विक्री करून जमा झालेली ५१ हजार ४७२ रूपये रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याचे लक्षात आले. अशोक सोनवणे यांनी तात्काळ राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. 




त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश रमेश गोसावी, रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. २३९/२०२३ भादंवि कलम ४०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत