गुहा येथे कानिफनाथ महाराज यात्रेस प्रारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गुहा येथे कानिफनाथ महाराज यात्रेस प्रारंभ

राहुरी प्रतिनिधी रविवार दि.१२ मार्च रोजी राहुरी तालुक्यातील गुहा येथे कानिफनाथ महाराज यात्रा जल्लोषात साजरा करण्यासाठी ग्रामस्थ व श्री कान्ह...

राहुरी प्रतिनिधी



रविवार दि.१२ मार्च रोजी राहुरी तालुक्यातील गुहा येथे कानिफनाथ महाराज यात्रा जल्लोषात साजरा करण्यासाठी ग्रामस्थ व श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट तयारीला लागले आहेत.


  गुहा गावचे ग्रामदैवत कानिफनाथ महाराज यात्रा शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे.गुहा गावात यात्रा सर्व धर्मातील ग्रामस्थ शांततेत एकोप्याने पार पाडत असतात.परंतु काही दिवसांपासून गुहा गावात दोन समाजात तेढ निर्माण झाल्यामुळे सामाजिक वातावरण दुषित झाले होते.


महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी दि.७ मार्च रोजी राहुरी येथे गुहा गावातील दोन्ही समाजाच्या नागरिकांची यात्रा उत्सव शांततेत पार पाडावी या साठी शांतता बैठक घेण्यात आली होती.दोन्ही गटातील नागरिकांमध्ये सामंजस्य साधण्यात तहसिलदार एफ.आर.शेख व पोलिश निरीक्षक मेघशाम डांगे यांना यश आल्याचे सध्यातरी दिसत आहे.


शांतता बैठकीत ठरल्याप्रमाणे शनिवार दि.११मार्च रोजी सायं.६ वा.मानाचा नैवैद्य व मानाच्या काठी मिरवणूक होणार आहे. रविवार दि.१२ मार्च रोजी सकाळी ८ वाजता प्रवरा नदी येथून आणलेल्या गंगाजल कावड यात्रेची मिरवणूक निघून गंगा स्नान व महापंचामृत अभिषेक होणार आहे. सायंकाळी ६ वा.काठी व छबिना मिरवणूक तर रात्री ९ वा.भक्ती गीताचा सुमधुर गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सोमवार दि.१३ मार्च रोजी सायंकाळी ४ वा. जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.


गुहा ग्रामस्थ व यात्रा कमिटीने मंदिर परिसर एकत्रित येत श्रमदानाने स्वच्छ केला आहे.गुहा गावात आजूबाजूच्या परिसरातील व पर जिल्हातील खेळणी दुकानदार, रहाट पाळणे, हलवाई दुकानदार तसेच इतर व्यावसायिकांच्या दुकानांसाठी स्वतंत्र जागेची साफसफाई केलेली आहे.  यात्रे निमित्त बाहेर गावावरून येणाऱ्या व्यावसायिकांना कुठलाही त्रास होवू नये म्हणून यात्रा कमिटीने सर्व नियोजन केले असल्याचे सांगण्यात आले आहे.


गुहा गावातील यात्रा दि.१२ व १३ मार्च रोजी होणार असून यात्रा शांततेत पार पाडावी म्हणून पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शना खाली डी.वाय.एस.पि.संदीप मिटके यांच्या आदेशाने पो.नि.मेघशाम डांगे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत