नारीशक्तीची शोभायात्रा व पथनाट्याने दुमदुमली सात्रळ पंचक्रोशी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नारीशक्तीची शोभायात्रा व पथनाट्याने दुमदुमली सात्रळ पंचक्रोशी

सात्रळ(वेबटीम) जागतिक महिला दिनानिमित्त सात्रळ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पंचक्रोशीत शोभायात्रा काढून 'करूया स्वागत स्त्री जन्माचे&...

सात्रळ(वेबटीम)




जागतिक महिला दिनानिमित्त सात्रळ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पंचक्रोशीत शोभायात्रा काढून 'करूया स्वागत स्त्री जन्माचे' या शीर्षकाचे सामाजिक आशय असणारे पथनाट्य चौकाचौकात सादर करून ग्राम प्रबोधन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. प्रभाकर माणिकराव डोंगरे यांनी विद्यार्थी रॅलीला मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

          लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ (ता. राहुरी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील महिला सबलीकरण कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शोभायात्रा आणि पथनाट्य सादरीकरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपप्रचार्य डॉ. दीपक घोलप, प्रा. दीनकर घाणे, डॉ. नवनाथ शिंदे, डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. अनंत केदारे, डॉ. गंगाराम वडीतके, प्रा. राहुल कडू उपस्थित होते.

     नारी आता अबला नाही, संघर्ष आमचा चालू राही. तुझ्यात तो अंश आहे, त्यामुळे जगात सुरू वंश आहे. स्त्री व्यर्थ नाही, सृष्टीचा अर्थ आहे. नारी घे तू उंच भरारी, फिरून पाहू नकोस तू माघारी. कुटुंबासाठी झिजणारी तू चंदन, स्त्रीशक्ती तुला त्रिवार वंदन. जबाबदारी सकट घेते भरारी, तक्रार नाही की थकवा नाही, इत्यादी घोषवाक्य लिहिलेले विद्यार्थिनींच्या हातामध्ये उंच फलक ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होते. वाचून विचार करण्यास प्रवृत्त करत होते.

           यावेळी सात्रळ बस स्थानक,  स्टेट बँक व  बाजार तळ परिसर येथे झांज व ढोल पथक, विद्यार्थिनी पदयात्रात 'करूया स्त्री जन्माचे स्वागत...' या पथनाट्याच्या माध्यमातून लोकजागर करण्यात आला. रॅलीप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. जयश्री रामराव सिनगर म्हणाल्या की, सहनशीलता, सृजनशीलता व समजण्याची शक्ती ही महिलांकडे आहे. या शक्तीचा वापर देशाच्या विकासासाठी व चांगला सुसंस्कृत नागरिक घडविण्यासाठी होत असतो.

         रॅलीमध्ये कु. गौतमी विकास कुळधरण यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून ग्रामस्थापुढे आपली भूमिका विशद केली. कु. वैष्णवी संदीप बेलकर यांनी डॉ. आनंदीबाई जोशी यांची वेशभूषा करून ग्रामस्थांशी संवाद साधला. कु. सुवर्णा सुरेश भागवत यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची वेशभूषा करून भाषण केले. आरती प्रवीण ताजणे यांनी माजी राष्ट्रपती डॉ. प्रतिभाताई पाटील यांच्या वेशभूषेत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. प्राजक्ता गोकुळ वाकचौरे यांनी झाशीची राणी, सानिया मिर्झा यांची भूमिका गायत्री विश्वनाथ गावडे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या वेशभूषेत शिंदे प्रियंका बाबासाहेब, कांचन शंकर पाटोळे हीने वकिलाची भूमिका, भालेराव दिपाली हिने राजमाता जिजाऊ, माहेश्वरी राजेंद्र सरोदे यांनी शिक्षिकेची तर बेलकर कोमल चांगदेव हीने आयएएस अधिकारी भूमिका, प्रतीक्षा जालिंदर गागरे, यांनी ताराराणींची भूमिका, तेजस्विनी भारत कोते भागवत मिसवड, एअर होस्टेच्या भूमिकेत सरोदे साक्षी तुकाराम आरोग्य परिचारिकेच्या भूमिकेत पल्लवी वाणी, कल्पना चावलाच्या भूमिके संगीता सुरेश वाणी, रिपोर्टरच्या भूमिकेत पुनम लक्ष्मण गागरे, मोरे संतोष दिपाली यांनी सिव्हिल इंजिनिअर या वेशभूषेत भूमिका करून ग्रामस्थांना संदेश दिला. यानंतर मुलीनी मोठ्या उत्साहात लेझीम कलेचे सप्रयोग सादरीकरण केली.

           उपक्रम यशस्वी करण्यासाठी महिला सबलीकरण कक्षाच्या समन्वयक उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. रोहिदास भडकवाड, डॉ. निलेश कान्हे, प्रा. माधुरी जेजुरकर, प्रा. अश्विनी साळुंके, प्रा. दीप्ती आगरकर, प्रा. स्वाती कडू, प्रा. गौरी क्षीरसागर, प्रा. लतिका पंडुरे, प्रा. सोनाली पारधी, प्रा. प्रियांका गागरे, प्रा. सोनाली मुन्तोडे यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत