लायन्स महाएक्सपोस उत्स्फूर्त प्रतिसाद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लायन्स महाएक्सपोस उत्स्फूर्त प्रतिसाद

कोपरगाव(वेबटीम)  महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन येथे पुर्वी महाशिवरात्रीला पंधरा दिवस शेतकरी प्रदर्शन भरत असे. शेती, उद्योग समूहाचे नवनवीन प्...

कोपरगाव(वेबटीम)



 महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन येथे पुर्वी महाशिवरात्रीला पंधरा दिवस शेतकरी प्रदर्शन भरत असे. शेती, उद्योग समूहाचे नवनवीन प्रयोग याविषयी माहिती मिळत असे. बाहेर खंडोबा मंदिर परिसरात तमाशाचे फड, जत्रा भरत असे.बाजार तळात खेळणी, पाळणे, फोटो स्टुडिओ, हाॅटेलं येत असत. कालांतराने प्रदर्शन बंद झाले. महाशिवरात्रीला गर्दी कमी होत गेली. त्यावेळी गोदावरी बारमाही वाहणारी होती लोक खेड्यातील गोदावरी नदीच्या पात्रात आंघोळ करून देवदर्शनासाठी येत असत. आता फक्त आठवणी उरल्या आहेत.

 गेल्या बारा वर्षांपूर्वी लायन्स क्लबने विस्मरणात गेलेले प्रदर्शन एक्सपो निमित्ताने सुरू केले तर कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समुहाचया सौ. पुष्पाताई काळे यांनी गोदाकाठ महोत्सव सुरू केला परिणामी अर्थचक्र फिरू लागले. नवनवीन तंत्रज्ञान विकसित उद्योग धंदे माहीत होऊ लागले आणि खूप काही.

यंदा लायन्स क्लबने शिवजयंती निमित्त आगळेवेगळे देखावा सादर करून अविस्मरणीय अनुभव दिला आहे. महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन येथे थोरांच्या, संतांच्या मुर्ती झाकल्या न जाता रंग देऊन सजवून प्रकाशित केल्या आहेत कारंजा सुरू केला आहे सहा दिवस अनेकविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून रसिकांची मने जिंकली आहेत.आज रविवार दिनांक १२/३/२०२३ रोजी रंगपंचमी निमित्ताने हास्य कविसंमेलन आयोजित केले होते.

यंदाचा एक्सपो अविस्मरणीय आठवण देऊन जाणारा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत