ये रिश्ता क्या कहलाता है ..! जगताप खरंच भाजपच्या वाटेवर? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ये रिश्ता क्या कहलाता है ..! जगताप खरंच भाजपच्या वाटेवर?

 नगर : वेबटीम         जिल्हा बँक निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत, यात आता भाजपमध्ये इन्कमिंगही सुरू झाली आहे, त्यामु...

 नगर : वेबटीम       


जिल्हा बँक निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत, यात आता भाजपमध्ये इन्कमिंगही सुरू झाली आहे, त्यामुळे काही दिवसांपासून विखेंजवळ गेलेले आमदार संग्राम जगताप हे देखील राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देऊन भाजपात जाणार का, या विषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.अर्थात ,असे घडल्यास सासरे शिवाजीराव कर्डीले यांचे राज्यात वजन वाढणारच आहे.

 खरतर जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचे आता लपून राहिलेले नाही, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयंत पाटलांचा गट एकसंघ राहिला, तर अजितदादांचा गट अनपेक्षितपणे फुटल्याचे दिसले. एवढ्यावरच हे थांबणारे नाही, अजूनही काही लोकांची पक्षात घुसमट सुरू असल्याची चर्चा आहे, काहींवर खरोखरच अन्याय झाल्याची भावना आहे, त्यामुळे ही लोकंही लवकरच पक्ष सोडून जातात की काय, हा प्रश्न निर्माण झालेला दिसतो.

यात, नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे नाव चर्चेत पुढे येते, काही दिवसांपासून खासदार डॉ सुजय विखें पाटील आणि त्यांची वाढलेली जवळीक, जगताप यांचे सासरे माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांचे जिल्हा बँकेत केलेले पुनर्वसन, यामुळे भाजपमध्ये न्याय मिळतो, असाच संदेश त्यांना मिळाला आहे, तर दुसरीकडे जगताप यांना राष्ट्रवादीने मंत्रीपद देताना डावलले आहे, मुंबईत एका हॉटेलवर सर्व आमदार एकत्र असताना जगताप  हे बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते, असेही राजकारण झाले.  मात्र मुख्य कारण म्हणजे ते अजितदादांच्या गटाचे असल्याचा फटका त्यांना बसल्याचे बोलले जाते, उलट जयंत पाटील गटाचे त्यांचे भाचे तनपुरे यांना पहिल्याच टर्मला मंत्री पदाची लॉटरी लागते, तर जगताप सलग दुसऱ्यांदा विजयी होऊनही त्यांना डावलले जाणे, ही वेदना आजही कार्यकर्त्यांच्या मनात कायम आहे. त्यामुळे आगामी काळात ही नाराजी उफाळून आणण्यात भाजप यशस्वी होणार का? याकडे लक्ष असणार आहे.  वास्तविकता अरूणकाका जगताप व संग्राम जगताप हे राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिले , मात्र त्यांना फळ मिळाले नाही, उलट तनपुरेना उमेदवारी दिली नाही तर ते पक्ष सोडून सेनेत गेले, राष्ट्रवादी विरोधातच त्यांनी निवडणूक लढवली, तरीही पुढच्या निवडणुकीत उमेदवारी व मंत्री पदाची बक्षिसी त्यांना दिली जाते, हीच दुखरी नस असणार आहे.

तर, शालिनीताई नगरमधून लढणार?                             राहुरी किंवा नगर शहरात भाजपची उमेदवारी ही शालिनीताई यांनी करावी असा जनतेचा सूर आहे. कर्डीले विधांनपरिषदेवर गेल्यास राहुरी मतदार संघ मोकळा होणार आहेच, मात्र तसे न घडल्यास शालिनीताई नगरमधून उमेदवारी करू शकतात, आणि विखेंची उमेदवारी ही जगताप यांना अडचणीची ठरू शकते, त्यामुळे भाजपकडून उमेदवारी करणे, हीच जगताप यांना सोयीचे ठरणारे आहे, असेही बोलले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत