श्रीरामपूर जिल्हा अन् नगरला माऊलीनगर नामांतरला वारकऱ्यांचा जाहिर पाठिंबा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूर जिल्हा अन् नगरला माऊलीनगर नामांतरला वारकऱ्यांचा जाहिर पाठिंबा

 देवळाली (प्रतिनिधी)-  शासनाने ४२-४३ वर्षांपासून रखडलेले जिल्हा विभाजन प्राधान्याने करावे. निकषाचे आधारे श्रीरामपूर जिल्हा जाहिर करावा.तसेच ...

 देवळाली (प्रतिनिधी)- 



शासनाने ४२-४३ वर्षांपासून रखडलेले जिल्हा विभाजन प्राधान्याने करावे. निकषाचे आधारे श्रीरामपूर जिल्हा जाहिर करावा.तसेच नगर शहराचे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीनगर नामांतर करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा या मागणीला साक्षी भाव दर्शन बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष हभप बाळकृष्ण खांदे आणि  संत कवी महिपती महाराज देवस्थानचे हभप बाळकृष्ण महाराज कांबळे यांचेकडून वारकऱ्यांचे जाहिर पाठिंबा पत्र स्वीकारताना श्रीरामपूर जिल्हा कृती समिती उपाध्यक्ष आणि पसायदान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी प्रतिपादन केले.

राहुरी फॅक्टरी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची मुक्ताबाईस दिलेली सनद या विषयावर दरमहा खांदे महाराजांची किर्तन सेवा सुरु आहे. याप्रसंगी वारकऱ्यांचे पाठिंबा पत्र स्वीकारताना राजेंद्र लांडगे बोलत होते.

शासनाने आधी जिल्हा विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा. त्याच बरोबर नगर शहराला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीनगर नामांतर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना मरणोत्तर भारतरत्न मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच आजी-माजी लोकप्रतिनिधींनी अर्थ संकल्पीय अधिवेशनात आवाज उठवावा. त्याच बरोबर जिल्ह्यातील सरपंच-उपसरपंच, गांव सोसायटी प्रतिनिधी,सर्व धर्मीय आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक प्रतिष्ठानें, पतसंस्था प्रतिनिधी, विविध संघटनेचे प्रतिनिधींनी केलेले ठराव किंवा सह्यांचे पाठींबा पत्र द्यावे. तसेच जिल्हावासीयांनी लोकसहभागातून जनजागृती अभियान राबवावे असे आवाहन राजेंद्र लांडगेंनी असेही म्हटले आहे.

 याप्रसंगी हभप खांदे म्हणाले कि, नेवासा पावन भूमीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. या अनुषंगाने आम्ही मोठ्या अभिमानाने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीनगर नावाचे स्वागत करतोय.शासनाने नगर शहराला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीनगर या नावाला प्राधान्य द्यावे यासाठी आम्ही वारकरी जाहिर पाठिंबा देत आहे.

तसेच हभप बाळकृष्ण महाराज कांबळे मनोगत व्यक्त केले कि,संतांची पावन भूमी म्हणून आपले जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. एकप्रकारे जिल्ह्याला आध्यात्मिक अधिष्ठानहि आहे. नेवासा येथील पावन भूमीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिणं म्हणजे सर्वांचे दृष्टीने परम भाग्याची गोष्ट आहे. या अनुषंगाने नगर शहराला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीनगर हे नांव शोभणारे आहे.  यासाठी आम्ही मोठया प्रमाणावर जिल्हाभर जनजागृती करू अशी ग्वाही देतो. त्याच बरोबर चौंडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थळ चौँडी येथे आहे. त्यांचेहि कार्याची नवीन पिढीला ओळख होणेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना मरणोत्तर भारतरत्न देणेसाठी अधिवेशनात शासन निश्चितच विचार करेल असेहि कांबळे महाराज शेवटी म्हणाले आहे.

या कार्यक्रमास भास्करराव तांबे नानासाहेब कोबरणे प्रवीण नवले एकनाथ बनकर गणेश तांबे राजेंद्र कदम संजय तांबे विनोद मुसमाडे राजू गिते कुंडलिक डौले भारत नरवडे अक्षय जु'द्रे अजिंक्य गायकवाड अरुण बिडवे विक्रम गाढे महेश कोळसे सुधाकर सांगळे आण्णासाहेब शेटे बाळासाहेब वाणी संदीप निर्मळ बाळासाहेब विश्वासराव राम उऱ्हे ज्ञानेश्वर भालेकर संजय कुंदे किरण गागरे मारुती कदम जयश्री खांदे ज्ञानेश्वरी नलावडे प्रियंका खांदे सरस्वती कोळसे सुनीता वाबळे गायत्री गाढे सुरेखा हापसे इत्यादी भाविक वर्गानी मोठया संख्येने पाठिंबा पत्रावर सह्या करत उस्फुर्त प्रतिसाद दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत