बाभुळगावच्या सौर ऊर्जेवरील प्रकल्पाबाबत आ. प्राजक्त तनपुरे यांचा विधानसभेत मुद्दा, शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा विज मिळणार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बाभुळगावच्या सौर ऊर्जेवरील प्रकल्पाबाबत आ. प्राजक्त तनपुरे यांचा विधानसभेत मुद्दा, शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा विज मिळणार

  राहुरी(प्रतिनिधी)  माजीमंत्री तथा राहुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ. प्राजक्त तनपुरे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राहुरी ता...

 राहुरी(प्रतिनिधी)

 माजीमंत्री तथा राहुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ. प्राजक्त तनपुरे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राहुरी तालुक्यातील बाभुळगाव येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत सौर उर्जा निर्मिती प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासून कार्यवाही करण्याचे आश्वासित केले होते. या पाठपुराव्यामुळे आजपासून वरवंडी व बाभुळगाव या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा चालू झाला आहे. 


 यावर बोलताना प्राजक्त तनपुरे म्हणाले की, वरवंडी व बाभूळगाव या दोन्ही गावातील जनतेने मला भरभरून प्रेम दिले आहे. माझ्यावर मोठा विश्वास पण टाकला आहे. पुढे मी आमदार होईल अथवा नाही याची मला पर्वा नाही. पण जो विश्वास जनतेनी २०१९ साली माझ्यावर टाकला, त्याला पात्र राहण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहे.


आ.प्राजक्त तनपुरे हे ऊर्जा राज्यमंत्री असताना वांबोरी, आरडगाव व बाभूळगाव येथे हे महत्त्वकांक्षी प्रकल्प मंजूर केले होते.बाभूळगाव सौरऊर्जा प्रकल्प पूर्णत्वास जाऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.अखेर विजेचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत