देवळाली प्रवरात आज रविवारी भव्य पालखी मिरवणूक , महंत उद्धव महाराज यांच्या हस्ते पूजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात आज रविवारी भव्य पालखी मिरवणूक , महंत उद्धव महाराज यांच्या हस्ते पूजन

  देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सवास उत्साहात प्रारंभ झाला असून  आज रविवार दिनांक १९ मार्...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



देवळाली प्रवरा येथील समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सवास उत्साहात प्रारंभ झाला असून  आज रविवार दिनांक १९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता श्री.समर्थ बाबुराब पाटील महाराज यांचा पालखी मिरवणूक सोहळा संपन्न होणार असून महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते पालखी पूजन झाल्यानंतर संजय बाबासाहेब पाटील(श्री.समर्थ बाबुराव पाटील महाराज यांचे वंशज) यांच्या निवासस्थानापासून पालखी मिरवणूक निघणार असून मंदिर परिसरात समोरोप होणार आहे.


या मिरवणूकित नाशिक, वैजापूर, बारामती व देवळाली प्रवरातील ब्रास बँड सहभागी होणार आहे.त्यानंतर शोभेच्या अतिषबाजी होणार आहे.


यात्रा उत्सवाचे आकर्षण असलेले दिल्ली व अजमेर येथील रहाट पाळण्यात बसण्याचा आनंद आजपासून लुटता येणार असून खरेदीसाठीच्या स्टोलवर नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडणार आहे.,


  पालखी मिरवणूक व यात्रेच्या आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत