तनपुरे कारखाना सुरू करण्यासाठी नव्हे तर शिक्षण संस्था ताब्यात घेण्यासाठी विरोधकांचा उठाठेव - खा.डॉ.सुजय विखे पा. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तनपुरे कारखाना सुरू करण्यासाठी नव्हे तर शिक्षण संस्था ताब्यात घेण्यासाठी विरोधकांचा उठाठेव - खा.डॉ.सुजय विखे पा.

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- सात वर्ष सभासदांना दिलेला शब्द पाळून आमच्या संचालक मंडळाने कोणत्याही प्रकारे भत्ता देखील घेतलेला नाही. मी तनपुरे क...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

सात वर्ष सभासदांना दिलेला शब्द पाळून आमच्या संचालक मंडळाने कोणत्याही प्रकारे भत्ता देखील घेतलेला नाही. मी तनपुरे कारखाना संलग्न शिक्षण संस्थेकडे कधी ढुंकूनही  बघायला आलो नाही किंवा कोणत्या कामगाराला राजकीय हित ठेवून त्रास दिलेला नाही.मात्र विरोधकांचा स्वार्थ कारखाना चालवणे असा नसून शिक्षण संस्था ताब्यात घेण्यासाठीचा उठाठेव असल्याचा आरोप खा.डॉ.सुजय विखे यांनी केला.

डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे कारखान्याची संलग्न असणाऱ्या श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ लक्ष्मीनारायण आदी संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या स्नेह मेळाव्यामध्ये तसेच विवेकानंद नर्सिंग होमच्या सुमारे १ कोटीरुपये खर्चून बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन व लोकनेते रामदास पाटील धुमाळ कॉलेज येथे बांधण्यात आलेल्या मुलींच्या होस्टेलचे उद्घाटन प्रसंगी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील हे बोलत होते.


    


यावेळी कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, व्हॉइस चेअरमन दत्तात्रेय ढुस, विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष केशवराव कोळसे ,खजिनदार विजय डौले, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुरसिंगराव पवार, जनरल सेक्रेटरी महेश पाटील, संचालक शामराव निमसे, मच्छिंद्र तांबे,रवींद्र म्हसे, बाळकृष्ण कोळसे, शिवाजी गाडे, उत्तमराव आढाव, मधुकर पवार ,अर्जुनराव बाचकर, गोरक्षनाथ तारडे ,नंदकुमार डोळस, अशोकराव खुरुद, डॉ.पंकज चौधरी,कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. एन.सरोदे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अधीक्षक ए.बी.पारखे, राहुरी नगर परिषदेचे विरोधपक्ष नेते दादा पाटील सोनवणे, माजी संचालक कारभारी डौले, डॉ.संजय भळगट, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, अमोल भनगडे, विवेकानंद नर्सिंग होमचे माजी अध्यक्ष उत्तमराव म्हसे, भाजपाचे राहुरी शहराध्यक्ष राजेंद्र उंडे, सर्जेराव घाडगे, ऋषभ लोढा नयन शिंगी, अर्जुनराव पानसंबळ, जिल्हा परिषद सदस्य राहुल शिंदे, अहमदनगरचे नगरसेवक निखिल वारे, नानासाहेब गागरे, सुभाष गायकवाड अनिल आढाव, पंचायत समिती सदस्य सुरेश बानकर, सुकुमार पवार, प्रदीप भुजाडी, विराज धसाळ, अक्षय तनपुरे, गणेश हारदे ,उत्तमराव मुसमाडे ,महेंद्र तांबे, आशिष बिडगर, भगवानराव कोळसे, अर्जुन पानसंबळ, ज्ञानेश्वर विखे, मनोज गव्हाणे आदि सह मान्यवर उपस्थित होते.



यावेळी बोलताना खा. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, सात वर्षाच्या सत्तेमध्ये आम्ही कधीही राजकारण केले नाही केवळ हा कारखाना सुरू राहावा याच्या संलग्न संस्था सुस्थितीमध्ये याव्यात एवढाच आमचा उद्देश राहिलेला आहे आणि शिक्षण संस्थेसाठी कारखाना ताब्यात घेतलेला नाही आमच्याकडे आधीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये संस्था आहेत त्यामुळे आम्हाला याची लालसा नाही फक्त हा कारखाना सुस्थितीमध्ये आणावा अशी इच्छा खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची होती या तालुक्याशी त्यांचे ऋणानुबंध होते म्हणून आम्ही हा खटाटोप केला गेली सात वर्षांमध्ये आम्ही मागील सत्ताधाऱ्यांनी केलेले पापे फेडीत आहोत बंद पडलेला कारखाना आणि सक्षमपणे चालवला आहे त्याचे नूतनीकरण केलेले आहे शिक्षण संस्थांवर देखील मोठ्या प्रमाणात कर्ज होते ते फेडून आम्ही कामगारांचे थकीत पगार देखील केले मात्र संस्थेच्या जागा आपल्या नावावर करून तेथे कॉम्प्लेक्स उभारून आपले घरे भरणाऱ्यांनी आमच्यावर आरोप केले मागच्या सत्ताधाऱ्यांनी शिक्षण संस्था खाल्ल्या ज्यांना या कारखान्याचे काही घेणे देणे नाही ज्यांचा एक टन देखील ऊस या कारखान्याला येत नाहीत स्वतःचा खाजगी कारखाना चालवणारे आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत हे पाप त्यांचेच आहे हे सर्व तालुका जाणून आहे आम्ही सात वर्ष सभासदांना दिलेला शब्द पाळलेला आहे संचालक मंडळाने कोणत्याही प्रकारे भत्ता देखील घेतलेला नाही आम्ही या शिक्षण संस्थेकडे कधी ढुंकून नही बघायला आलो नाही किंवा कोणत्या कामगाराला राजकीय हित ठेवून त्रास दिलेला नाही मात्र विरोधकांचा स्वार्थ कारखाना चालवणे असा नसून शिक्षण संस्था ताब्यात घेणे यासाठी आहे त्यासाठीच हा उठाठेव सुरू आहे आम्ही आमच्या घरातून चाळीस कोटी रुपये घातले आणि हा कारखाना सुरू केला आहे मागील वर्षी देखील आम्ही कारखाना सुरू केला असता मात्र काही जणांना ते नको होते म्हणून ते कोर्टामध्ये गेले माफ करण्याची खासियत विखे कुटुंबांमध्ये आहे आम्ही बऱ्याच गोष्टी माफ करत असतो मात्र कोणी त्याचा गैरसमज करून घेऊ नये केलेल्या कामाची स्तुती कोणी केली नाही आम्ही आमच्या सत्ता कालावधीमध्ये स्वतःच्या भांडवला मधून विवेकानंद नर्सिंग होम येथे सुमारे एक कोटी रुपयांची इमारत उभारली राहुरी कॉलेज मध्ये देखील मुलींचे हॉस्टेल सुरू केले याचे कौतुक कोणाला नाही कामगारांबद्दल द्वेष निर्माण करणे हे सहकारासाठी घातक असते हे विखे कुटुंबीय जाणून आहे म्हणून आम्ही कोणा विषयी द्वेष निर्माण केलेला नाही आम्ही खासदार बाळासाहेब विखे  पाटील यांचे वारसदार आहोत द्वेष भावनेने कधीही काम करणार नाही. मात्र तालुक्यातील लोकांना हे कळत नाही ज्यांनी बंद कारखाना सुरू करण्यासाठी मोठे योगदान दिले त्या माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना निवडणुकीत हरवले व ज्यांनी कारखाना बंद पाडा त्यांना निवडून दिले मात्र हा कारखाना सुरू करण्यामध्ये शिवाजीराव कर्डिले यांचा देखील सिंहाचा वाट आहे. निवडणुकीमध्ये प्रत्येक पैशाचा हिशोब मी देणार आहे त्या पैशांचा वापर मी योग्य पद्धतीने केला म्हणूनच कारखाना व शिक्षण संस्था सुस्थितीमध्ये आलेले आहेत.

    यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे यांनी सांगितले की खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करताना संचालक मंडळातील कोणत्याही सदस्यांनी कोणतेही प्रकारे मानधन स्वीकारले नाही मग आर्थिक विषय संदर्भामध्ये आरोप करण्याचा अधिकार दुसऱ्यांना कसा ज्यांनी आमच्यावर आरोप केलेले आहेत त्यांनी शनि देवाच्या ओठावर येऊन ते सिद्ध करून दाखवावेत हे संचालक मंडळ या ठिकाणी यायला तयार आहे सुजय दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कामगारांना न्याय देण्याची भूमिका आमची राहिलेली आहे त्यामुळेच गेली सात वर्ष कारखाना सुस्थितीत आणण्यामध्ये चांगल्या प्रमाणात यश आलेले आहे त्याचबरोबर शिक्षण संस्था देखील सुस्थितीत आणता आल्या आहेत.

      यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विवेकानंद नर्सिंग ट्रस्टचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी सांगितले की, विवेकानंद नर्सिंग होम मध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून जे करता येईल ते सर्व सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कामगारांचे पगार त्याचबरोबर संस्थेवर असणारी कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला गेला व त्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश आलेले आहे त्यामुळे पुन्हा या संस्था ऊर्जेत अवस्थेमध्ये आणल्या गेले आहेत तालुक्याचे वैभव टिकून ठेवण्याचा प्रयत्न यातून होत आहे.

 आभार भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रवींद्र म्हसे यांनी मानले आहेत.

कार्यक्रमाच्या विवेकानंद नर्सिंग होमचे बी.आर. पागिरे, प्राचार्य,डॉक्टर बि. डी सिरस्कर, एम आर गागरे यांच्यासह सर्व स्टाफ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत