अवैध गौण खनिज उत्खनन त्वरित बंद करा : स्नेहल सांगळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अवैध गौण खनिज उत्खनन त्वरित बंद करा : स्नेहल सांगळे

आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील कनगर व राहुरी कारखाना एमआयडीसी परिसरातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावे असे निवेदन र...

आंबी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील कनगर व राहुरी कारखाना एमआयडीसी परिसरातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावे असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महिला आघाडीच्या राहुरी तालुका अध्यक्ष स्नेहल सुरेंद्र सांगळे यांनी राहुरीचे तहसीलदार यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की राहुरी तालुक्यातील कनगर व राहुरी कारखाना, एमआयडीसी परिसरात येथील अवैद्य गौण खनिज उत्खन सर्रास सुरू आहे. मुरूम, खडी यांची कोणत्याही प्रकारची रॉयल्टी भरलेली नसतानाही गौण खनिज माफीया दिवस रात्र अवैध पद्धतीने गौण खनिज उत्खनन व वाहतूक करत आहेत. त्यामुळे जनसामाने जीवन विस्कळीत होत आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने गौण खनिज उत्खनन वाहतुकीस बंदी असतानाही मौजे कनगर व राहुरी कारखाना एमआयडीसी परिसरात महसूल मंत्र्यांचा आदेश धाब्यावर बसवून गौण खनिज उत्खनन व वाहतूक आज तागायात चालू आहे. सदर उत्खनन हे १२ तासाच्या आत बंद न झाल्यास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन देऊन राहुरी तहसील कार्यालयासमोर सोमवार दिनांक १३ मार्च २०२३ रोजी उपोषणास बसणार आहे सांगळेयांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष स्नेहल सुरेंद्र सांगळे, स्नेहल किरण दिवे, रेखा प्रकाश पोपळघट, छाया अशोक गुंजाळ, अर्चना धनवटे, शबाना पठाण, सखुबाई भगत, सरला भगत, आसराबाई जाधव आदींच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत