राहुरी तालुक्यातील 'या' गावातील सरपंचावरचा अविश्वास ठराव मंजूर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी तालुक्यातील 'या' गावातील सरपंचावरचा अविश्वास ठराव मंजूर

आंबी(वेबटीम)  राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या पिंपळगाव फुणगीचे सरपंच रामदास वडितके यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव ग्राम...

आंबी(वेबटीम)



 राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या पिंपळगाव फुणगीचे सरपंच रामदास वडितके यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव ग्रामपंचायत कार्यालयात राहुरीचे तहसिलदार एफ. एस. शेख यांच्या प्रमुख उपस्थीतच नुकताच मंजुर झाला आहे. 


ग्रामपंचायतीचे सरपंच वडितके यांच्या विरोधात ७ विरुद्ध २ अशा फरकाने ठराव झाला. ग्रामपंचायतीचे एकूण नऊ सदस्य असून दवणगावसह सातगाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष शिवाजी भिमराज जाधव, उपसरपंच सुनिता दत्तात्रय जाधव, सुनिता गोरक्षनाथ वर्पे, तृषार अण्णासाहेब फुणगे, राजेंद्र हरीभाऊ तोरे, रोहीणी राहुल नान्नोर, संगिता विलास जाधव असे एकूण सात सदस्य त्यांच्या विरोधात गेल्याने वडीतके यांचे सरपंचपद संपुष्टात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत