राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरासाठी 'या' रस्त्याला ९० लाख ३३ हजार रुपयांची मंजुरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरासाठी 'या' रस्त्याला ९० लाख ३३ हजार रुपयांची मंजुरी

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी  व देवळाली प्रवरासाठी  अत्यंत महत्त्वाचा असलेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अण्णासाहेब चोथे वस्ती र...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी  व देवळाली प्रवरासाठी  अत्यंत महत्त्वाचा असलेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अण्णासाहेब चोथे वस्ती रस्त्याला खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या निधीतून 99 लाख ३०  हजार रुपयांची मंजुरी मिळाली असून या रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


राहुरी कारखाना मध्यवर्ती कार्यालय समोरून जाणार हा रस्ता देवळाली प्रवरा शहराला जोडला जातो. बेलापूर- श्रीरामपूर रस्त्याने येणारी वाहतूक ही निम्म्या प्रमाणात कमी होऊन स्थानिक लोक देवळाली प्रवरा चोथे वस्ती रस्त्याने राहुरी फॅक्टरी येथे येण्यासाठी पसंती देतील. 


गेल्या वीस वर्षापासून या रस्त्याचे काम रखडलेले आहे पावसाळ्यात तर नागरिकांचे अत्यंत हाल होतात या रस्त्याने देवळाली प्रवरा, शेटे वस्ती, टाकळीमिया चोथे वस्ती, मुसमाडे वस्ती हा भाग राहुरी फॅक्टरी ला जोडला गेलेला आहे.


या परिसरात परिसरातील विद्यार्थी, वृद्ध महिला यांची या रस्त्याने ये-जा सुरू असते. हा रस्त्याला तब्बल एक कोटी रुपयांनी मंजूर झाल्याने नागरिकांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत या रस्त्यासाठी मंजुरी आली असून जिल्हाधिकारी यांनी नगरपालिका प्रशासनाला सदर कामाची निविदा काढण्याबाबत आदेशित केले आहे.


 या रस्त्याचे काम मार्गी लावावे यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील कराळे, माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे यांच्यासह विविध संघटनांनी सातत्याने खा.सदाशिव लोखंडे यांच्याकडे पाठपुरावा केला. या रस्त्याला मंजुरी मिळून काम सुरू असल्याने सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत