गणेगाव रोड व राहुरी फॅक्टरीतील सरस्वती कॉलनी परिसरात बिबट्याचा वावर, कुत्र्यांचा पाडला पडशा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गणेगाव रोड व राहुरी फॅक्टरीतील सरस्वती कॉलनी परिसरात बिबट्याचा वावर, कुत्र्यांचा पाडला पडशा

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) येथील समर्थनगर परिसरातील सरस्वती कॉलनी,  गणेगाव रोड परिसर व वाणी मळा परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून परिसरातील कुत्...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



येथील समर्थनगर परिसरातील सरस्वती कॉलनी,  गणेगाव रोड परिसर व वाणी मळा परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून परिसरातील कुत्रे, शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला असल्याने नागरिक व शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे.


राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर पाठीमागचा परिसर तसेच समर्थनगर परिसरातील सरस्वती कॉलनी, गणेगाव रोड, वाणी मळा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे. या भागातील ऊस, गिन्नी गवत, फळबागा परिसरात बिबट्या दिसून येत आहे. अनेक शेळ्या व कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला चढवून त्यांना ठार केले आहे.


 याबाबत वनविभागाकडे स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा पिंजरा बसविण्याची मागणी केली मात्र वनविभागाने दुर्लक्ष केले आहे. वन विभागाने याप्रकरणी लक्ष घालून तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गट शहरप्रमुख विजय गव्हाणे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत