आदर्श नागरी पतसंस्थेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आदर्श नागरी पतसंस्थेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विष्णुपंत गीते व व्हा.चेअरमनपदी आबासाहेब वाळुंज यांची निवड झा...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विष्णुपंत गीते व व्हा.चेअरमनपदी आबासाहेब वाळुंज यांची निवड झाल्याबद्दल राहुरी फॅक्टरी येथील ऋषभ लोढा मित्र परिवार व वर्धमान एजन्सीच्यावतीने सन्मान करण्यात आला.




यावेळी आदर्श नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे व संस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन विष्णुपंत गीते व व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज यांचा माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी वर्धमान लोढा, युवा उद्योजक ऋषभ लोढा उपस्थित होते.


या कार्यक्रमास खा.सुजय विखे यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर विखे, आदर्श नागरी पतसंस्थेचे संचालक रामभाऊ काळे, प्रकाश सोनी, माजी संचालक पुंजभाऊ गांडूळे, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, माजी नगरसेवक प्रदीप गरड, योगगुरू किशोर थोरात, राहुरी अर्बन क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रशांत काळे, अब्बास सय्यद, निलेश धनवटे, पंकज हारदे, तौफिक शेख आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत