सात्रळ येथे ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात" - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ येथे ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात"

सात्रळ/वेबटीम:- येथील प्रजापती  ब्रह्माकुमारी  ईश्वरीय विश्वविद्यालयात  राजयोगी डॉ.गुलजारदादी यांचा द्वितीय  स्मृतिदिन  मोठया भक्तिभावात साज...

सात्रळ/वेबटीम:-


येथील प्रजापती  ब्रह्माकुमारी  ईश्वरीय विश्वविद्यालयात  राजयोगी डॉ.गुलजारदादी यांचा द्वितीय  स्मृतिदिन  मोठया भक्तिभावात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी  म्हणून  पुणे  येथील राजयोगिनी  नलिनी दिदी होत्या.भर गच्च अश्या  भक्तिरसाच्या  कार्यक्रमात सकाळी  योगभट्टी क्लास त्यानंतर राजयोगिनी ब्र. कु. गुलजार दादी यांना श्रद्धांजली  वाहून भोग अर्पण  करण्यात  आला व त्यानंतर  उपस्तिथ भक्तजनांनी  ब्रह्माभोजनचा  आस्वाद  घेतला.राजयोगिनी  नलिनी दिदी  यांनी आपल्या  उपदेशिय मागर्दर्शनातून ब्र. कु. गुलजार दादीचा जीवन  परिचय  करून देत ईश्वरीय ज्ञान आत्मसात कसे करावे याबाबद मोलाचे  मार्गदर्शन  केले. 


कार्यक्रम  यशस्वी पणे पार पाडण्यासाठी पुण्याचे राकेशभाई, माउंट अबू वरून आलेले प्रशांत भाई, बापूभाई, ब्र.कु. अर्चना दिदी, वंदनादिदी, ब्र.कु. पद्मादिदी,ब्र.कु. स्वातीदीदी,अर्चना  प्रधान, ब्रह्माकुमार शिवाजीभाई  यांनी परिश्रम  घेतले. तसेच  कार्यक्रमास  ऍड. बाळकृष्ण चोरमुंगे, विजयभाऊ कडू, भाऊसाहेब  सजन, बाळूशेट गांधी, सुभाष शेजवळ, प्रकाशशेठवालझाडे, तुकारामशेट सोनार, रंगनाथजी पांडे, संतोषशेट लोढा, राजू बुऱ्हाडे, नामदेव  डुक्रे, राजूभाऊ  मुंदडा, कोल्हार चे संजूशेट  शिंगवी, संपत खर्डे, मोहनीराज कडस्कर, बापूसाहेब  देवकर, अण्णासाहेब खर्डे,मछिंद्र दिघे, गीताराम शिंदे, उषाताई  कडू, अनिता व वैशाली वालझाडे, निर्मलाताई सजन, संगीताताई सोनवणे तसेच इतर भक्तजन, ग्रामस्थ मोठया संख्येने  उपस्तिथ होते. कार्यक्रमाची  सांगता पसायदानाने  झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत