प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे काम खा. लोखंडेचेंच.. -औताडे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे काम खा. लोखंडेचेंच.. -औताडे

कोपरगाव(वेबटीम) नुकतेच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील पोहेगाव  देर्डे चांदवड ते कुंभारी  रस्त्यासाठी कोट्यावधी रुपये निधी ...

कोपरगाव(वेबटीम)



नुकतेच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील पोहेगाव  देर्डे चांदवड ते कुंभारी  रस्त्यासाठी कोट्यावधी रुपये निधी मंजूर झाला. सदर कामाला प्रशासकीय मान्यता मिळालेली असून ही रस्त्याची कामे मार्गी लावण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते नितीनराव औताडे यांनी खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्याकडे सततचा पाठपुरावा केलेला होता.प्रधानमंत्री सडक योजनेची कामे सुचवण्याचा अधिकार खासदारांना असल्याने त्यांनी वरील काम सुचवले व पाठपुरावा करून ते मंजूर करून घेतले त्यामुळे त्या कामाचे श्रेय खासदार लोखंडे यांचेच आहे. मात्र तालुक्यातील कोणतेही काम मंजूर झाले की शासकीय पातळीवरून माहिती गोळा करायची आणि बातम्या देऊन स्वतःचेच ढोल स्वतःच वाजवायचे ही प्रथा तालुक्याला नवी नाही त्यामध्ये सध्याचे आमदार काळे फारच आघाडीवर आहे. आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठीच कार्यकर्त्यांचा आधार घेत त्यांनी टीका टिपणीची जुनी पद्धत कायम ठेवली असल्याचे पोहेगांवचे सरपंच अमोल औताडे यांनी प्रसिद्धी पत्रात स्पष्ट केले. 


कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव देर्डे चांदवड ते कुंभारी रस्त्यासाठी   7 कोटी 81 लाख  रुपये निधी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला. या कामाच्या संदर्भात आमदार काळे यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. वृत्तपत्रात बातम्या देऊन नाकर्तेपणाचा त्यांनी कळस गाठला त्याला प्रतिउत्तर म्हणून खासदार लोखंडे यांनी मंजूर केलेल्या कामांचे श्रेय त्यांनाच मिळावे यासाठी आम्ही प्रसिद्धीपत्रक काढले यात काही गैर नाही. ग्रामपंचायती पासून ते केंद्र सरकारपर्यंत सर्व पैसा हा जनतेचाच कर रूपाने जमा झालेला असतो. मात्र प्रत्येक संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी वेगवेगळे असतात व त्यांना त्यांचे अधिकार वापरून विकास कामे मंजूर करायचे असतात. याची कदाचित आमदार काळे यांना जाणीव नसावी कारखान्यावरून पीए विभागामार्फत गावातील कार्यकर्त्यांच्या नावे बातम्या देऊन दुसऱ्यावर चिखल फेक करायची आणि आपला नाकर्तेपणा झाकायचा हा केविलपणा प्रयत्न आहे.  तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असताना त्यावर साधा आवाज उठवायचा नाही. 


गेल्या अडीच वर्षात विधानसभेत समन्यायी पाणी वाटपा बद्दल ब्र शब्द काढला नाही , रब्बीचे दोन आवर्तन देण्याचे कबूल करून देखील अवघ्या सोळा दिवसात आवर्तन आवरते घेतले तरी देखील आमदार या विषयावर बोलायला तयार नाही राज्य सरकारच्या निधीमधून रांजणगाव देशमुख ते झगडेफाटा या वीस किलोमीटर रस्त्याच्या डागडुजीचे काम मंजूर करून ढोल पिटवणाऱ्या आमदारांनी आपल्या पगारी पीए सेक्शनच्या माध्यमातून कोणाची लायकी काढू नये. मी देखील पोहेगांव सारख्या आदर्श ग्रामपंचायतीचा लोकनियुक्त सरपंच असून सात हजार  मतदारांमधून बहुमताने निवडून आलेलो आहे पोहेगाव व माहेगाव ग्रामपंचायतींना केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना द्वारे निधी मिळतो तरी देखील पोहेगांवच्या व माहेगांवच्या विकासामध्ये मोठी तफावत का आढळून येते याचे परीक्षण आ काळे यांनी करावे माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करून जनतेची दिशाभूल टाळावी असेही शेवटी औताडे यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत