राहुरी फॅक्टरी(वेबटीम) नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम, आत्मजा फौंडेशन, भार्गवी मेकओव्हर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार २६ ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम, आत्मजा फौंडेशन, भार्गवी मेकओव्हर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार २६ मार्च रोजी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना"आशात्मजा" पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या हॉटेल जयश्री येथे रविवारी दुपारी २ ते ४ या वेळेत नूतन जी मिस्त्री ( मिसेस ग्लोबल ब्युटी क्वीन मलेशिया-२०२२), मा.सौ.डॉ.वंदना मुरकुटे ( मा. सभापती श्रीरामपूर ) सौ.संध्या मेढे (सामाजिक कार्यकर्ता अहमदनगर)श्री. गोरख देवरे सर (नॅशनल डायरेक्टर, NHRPC) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.अहमदनगर जिल्ह्यात विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या महिलांना सदर पुरस्कार वितरित केले जाणार आहे.
या कार्यक्रमास महिलांनी उपस्थित रहावे कु. भार्गवी पुराणिक (संचालिका, भार्गवी मेक ओव्हर) व यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत