ग्रामिण भागातील मुले अष्टपैलु असतात- गटशिक्षणाधिकारी फटांगरे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ग्रामिण भागातील मुले अष्टपैलु असतात- गटशिक्षणाधिकारी फटांगरे

संगमनेर (प्रतिनिधी)  शिक्षण सुरु झाल्यापासुन पंधरा वर्षे आयुष्यातील महत्वाचे असतात.अभ्यासासाठी वेळ देणारे मुले आई वडीलांचे नाव मोठे करतात .ज...

संगमनेर (प्रतिनिधी) 




शिक्षण सुरु झाल्यापासुन पंधरा वर्षे आयुष्यातील महत्वाचे असतात.अभ्यासासाठी वेळ देणारे मुले आई वडीलांचे नाव मोठे करतात .जिल्हा परिषदेत शाळेतील मुले ही सामान्य कुटुंबातुन आलेले असतात.परिस्थितीशी दोन हात करण्याची त्यांची क्षमता असते.त्यामुळे ही मुले ख-या अर्थाने अष्टपैलु असतात असे प्रतिपादन संगमनेर पंचायत समीतीच्या गटशिक्षणाधिकारी सुवर्णाताई फटांगरे यांनी केले 

 त्या संगमनेर तालुक्यातील मोठेबाबावाडी(लोहारे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्नेहसमेलन व शिक्षक अभिजीत आगलावे यांचा निरोप समारंभ प्रसंगी  आयोजीत कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणुन बोलत होत्या.अध्यक्षस्थानी दिलीप पोकळे होते.यावेळी येथुन बदली झालेले शिक्षक अभिजीत आगलावे यांना ग्रामस्थांनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले.

स्नेहसमेलनानिमीत्त आकर्षक वेशभुषा ,सुमधुर संगिताच्या तालावर बालचमुने ठेका धरला होता.या कार्यक्रमासाठी पालकवर्गाने उपस्थिती लावुन मुलांना प्रत्येक गीतावर बक्षीसे देऊन दाद दिली.देशभक्तीपर गिते,लावणी,नाटीका,सवांद यासारख्या विविध गोष्टींचा समावेश करुन वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.

यावेळी राजहंस दुध संघाचे संचालक संजय पोकळे,राजहंस ट्रान्सपोर्टचे संचालक बाळासाहेब पोकळे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी चौधरी,लोहारेच्या सरपंच ताराबाई सोनवणे,उपसरपंच राहुल महाराज पोकळे,मिरपुरच्या सरपंच कमलबाई  कापकर,खडकीवाकीचे सरपंच सचिन मुरादे,उपसरपंच जालींदर मुरादे,बहादराबादचे माजी सरपंच विक्रम पाचोरे,सोमनाथ पाचोरे,मेजर बाळासाहेब काळे,डॅा अतुल गुळवे,रामनाथ कार्ले,अरुण महाले,अरुण पोकळे,विनोद पोकळे,अमोल पोकळे,डॅा संदिप पोकळे,प्रकाश पोकळे,बबन पोकळे,गणपत पोकळे, माधव पोकळे,प्रदिप पोकळे,कृष्णा पोकळे,अजित पोकळे,दादाभाऊ पोकळे,सागर पोकळे,भाऊसाहेब पोकळे,सोपान पोकळे,जया पोकळे,,छाया पोकळे,रंजना पोकळे,वंदना पोकळे,वर्षा  पोकळे,साईनाथ पोकळे,बाळासाहेब पोकळे,डॅा शुभम पोकळे,प्रविण पोकळे आदिसह पालक उपस्थित होते.


कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक अशोक जगताप व शिक्षक अभिजीत आगलावे यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचालन स्वाती आगलावे व प्रणिता नेहे यांनी केले



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत