राहुरी फॅक्टरीतील ओमकार हॉस्पिटलचे उद्या गुरुवारी महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा.यांच्या हस्ते उदघाटन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील ओमकार हॉस्पिटलचे उद्या गुरुवारी महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा.यांच्या हस्ते उदघाटन

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) येथील नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या डॉ.वामन फाउंडेशन संचलित ओंकार हॉस्पिटल व ट्रॉमा सेंटर मल्टीस्पेशालिटी हेल्थ केअर स...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



येथील नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या डॉ.वामन फाउंडेशन संचलित ओंकार हॉस्पिटल व ट्रॉमा सेंटर मल्टीस्पेशालिटी हेल्थ केअर सेंटरचा व विस्तारिकरण व अद्यावत सुविधांचा उदघाटन सोहळा उद्या गुरूवार दि.३० मार्च रोजी सकाळी १० वाजता राज्याचे महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.



  या कार्यक्रमास खा.डॉ.सुजय दादा विखे, नोबेल हॉस्पिटलचे संचालक डॉ.बापूसाहेब कांडेकर, माजी खा.प्रसादराव तनपुरे आदिंसह  आ.प्राजक्त तनपुरे, माजी आ.शिवाजीराव कर्डिले, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, तहसीलदार एफ. आर.शेख, पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, मुख्याधिकारी अजित निकत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपाली गायकवाड, डॉ.प्रसाद ढुस, डॉ.संजय भळगट, डॉ.महेश कोहकडे, डॉ.कौस्तुभ मेहत्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.


तरी या उदघाटन सोहळा कार्यक्रमास व स्नेहभोजनास उपस्थित रहावे असे आवाहन श्री.केरु दगडू वामन, डॉ.रवींद्र केरु वामन, सौ.प्रतिभा रवींद्र वामन आदींनी केले आहे.


सकाळी ९ वा.प्रा.गणेश शिंदे यांचे व्याख्यान

 डॉ.वामन यांच्या ओमकार हॉस्पिटलच्या उदघाटन सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेश शिंदे व्याख्यान संपन्न होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत