उपक्रमशिल शिक्षिका दीपाली राजेंद्र पुराणिक(बोलके) यांना राज्य शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उपक्रमशिल शिक्षिका दीपाली राजेंद्र पुराणिक(बोलके) यांना राज्य शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर

  राहुरी(वेबटीम) महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविका व संस्थाना राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून राज्...

 राहुरी(वेबटीम)



महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविका व संस्थाना राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून राज्यस्तरीय, विभागीय व जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहे. राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील उपक्रमशिल शिक्षिका सौ.दीपाली राजेंद्र पुराणिक(बोलके) यांना जिल्हास्तरावरचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.


महिला व बाल विकास क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या समाजसेविकांच्या व संस्थांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीकोनातून महिला व बाल विकास विभागांतर्गत राज्यातील समाजसेविका व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन १९९६-९७ पासून देण्यात येत आहे.


सन २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८ २०१८-१९ व २०१९-२० या वर्षाचे राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरपुरस्कारार्थीची निवड करणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.त्यानुसार हे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून 

राज्यस्तरीय, विभागीय व जिल्हास्तरिय असे हे पुरस्कार जाहीर झाले आहे.



राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील उपक्रमशिल शिक्षिका सौ.दीपाली राजेंद्र पुराणिक(बोलके) यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची शासनाने दखल घेऊन जिल्हास्तरावरचा पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार घोषित केला आहे.लवकरच या पुरस्काराचे शानदार कार्यक्रमात वितरण होणार आहे.


या पुरस्काराबद्दल सौ.दीपाली राजेंद्र पुराणिक(बोलके) यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत