जिल्हा बँकेच्या पराभव जिव्हारी,' त्या संचालकांसह फाळकेंची हकालपट्टी करा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्हा बँकेच्या पराभव जिव्हारी,' त्या संचालकांसह फाळकेंची हकालपट्टी करा

नगर : वेबटीम  जिल्हा बँकेतील पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवाचे खापर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यावर फोडले ...

नगर : वेबटीम 



जिल्हा बँकेतील पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवाचे खापर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यावर फोडले जात असून, त्या गद्दार संचालकांसह फाळके यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी आज युवकचे कपिल पवार व संजय कोळगे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.



जिल्हा बँकेच्या चेअरमन पदासाठी चंद्रशेखर घुले यांच्यासह राहुल जगताप, भानुदास मुरकुटे, प्रशांत गायकवाड हे इच्छुक होते. मात्र पक्ष आदेश देईल त्याचे काम करण्याचे ठरले होते, पक्षाने घुले यांचे नाव फायनल केले, मात्र त्यानंतर पाच सदस्य फुटल्याने महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचे कपिल पवार व संजय कोळगे यांनी सांगितले.


जिल्हा बँकेच्या चेअरमन निवडीवेळी जिल्हाध्यक्ष फाळके यांना जिल्ह्यातील घडामोडी माहिती असायला हवा होत्या, मात्र त्यांनी ती माहिती वरिष्ठ नेत्यांकडे दिली नाही, त्यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप पवार व कोळगे यांनी केला असून  गद्दार संचालकांसह जिल्हाध्यक्ष फाळके यांची हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत