ओंकार हॉस्पिटल हे डॉ.वामन यांच्या कष्टाचे व प्रामाणिकपणाचे प्रतीक- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ओंकार हॉस्पिटल हे डॉ.वामन यांच्या कष्टाचे व प्रामाणिकपणाचे प्रतीक- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  प्रचंड जिद्द व इच्छाशक्ती असलेल्या डॉ.रवींद्र वामन यांनी उभारलेले अद्यावत  ओंकार हॉस्पिटल हे त्यांच्या कष्टाचे व प्र...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 प्रचंड जिद्द व इच्छाशक्ती असलेल्या डॉ.रवींद्र वामन यांनी उभारलेले अद्यावत  ओंकार हॉस्पिटल हे त्यांच्या कष्टाचे व प्रामाणिकपणाचे प्रतीक असून येत्या काळात डॉ.वामन यांच्या हातून  गोरगरिब रुग्णांची सेवा घडेल शंका नाही असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांनी केले. 





नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या डॉ.वामन फाउंडेशन संचलित ओंकार हॉस्पिटल व ट्रॉमा सेंटर मल्टीस्पेशालिटी हेल्थ केअर सेंटरचा व विस्तारिकरण व अद्यावत सुविधांचा उदघाटन सोहळा गुरुवारी महसुलमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पार पडला प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नोबेल हॉस्पिटलचे संचालक डॉ.बापूसाहेब कांडेकर होते.तर यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रास्तविक डॉ.रवींद्र वामन यांनी केले.

 पुढे बोलताना ना. राधाकृष्ण विखे म्हणाले की साधारण ८ वर्षांपूर्वी डॉ.रवींद्र वामन यांनी छोट्याशा जागेत आपल्या रुग्णसेवेला प्रारंभ केला. त्यावेळी मनात शंका होती की,या हॉस्पिटलचे काय भवितव्य असणार, परंतु डॉ.रवींद्र वामन यांनी प्रचंड जिद्द व इच्छाशक्तीच्या जोरावर आज अद्यावत हॉस्पिटल सुरू केले.डॉ.वामन यांच्या कष्टाचेच हे प्रतीक असून वारकरी व शेतकरी कुटुंबातील डॉक्टर मुलाने ग्रामीण भागातील रूग्णासाठी शहराच्या तोडीस तोड सेवा व सुविधा देणारे हॉस्पिटल उभे केले ही निश्चित सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.


  नगर-मनमाड रस्ता भविष्यात सहापदरी होणार असून वाहतुकीचा ताण पाहता अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने ओंकार हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमुळे अनेकांना जीवदान मिळणार असल्याचे ना.विखे म्हणाले.


 नोबेल हॉस्पिटलचे संचालक बापू कांडेकर म्हणाले की, डॉ.रवींद्र वामन हे होतकरू असून नवीन शिकण्याची आवड त्यांना आहे. नोबेल हॉस्पिटलमध्ये ते काम करत असताना ड्युटी व्यतिरिक्त जास्त वेळ थांबुन त्यांनी रुग्णसेवा करता करता आपल्या ज्ञानात भर पाडून घेतली आहे. कष्ट करण्याची प्रचंड क्षमता असल्याने ग्रामीण भागात कार्पोरेट हॉस्पिटल उभारून उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा वसा घेतला आहे. यावेळी प्रा.गणेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी भेट देऊन डॉ.रवींद्र वामन यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी व्यासपीठावर केरु वामन, डॉ.भागवत सिनारे, राहुल पारधे, तनपुरे कारखान्याचे उपाध्यक्ष दत्तात्रेय ढुस, संचालक महेश पाटील, शिवाजी गाडे, प्रेरणा मल्टिस्टेटचे चेअरमन सुरेश वाबळे, साई आदर्श मल्टिस्टेट चेअरमन शिवाजीराव कपाळे, विखे कारखान्याचे संचालक कैलास तांबे, प्रांताधिकारी डॉ.अनिल पवार, तहसीलदार एफ.आर.शेख, मुख्याधिकारी अजित निकत, पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, आदर्श पतसंस्थेचे चेअरमन विष्णू गीते, माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, आबासाहेब वाळुंज, राहुरी निधीचे चेअरमन रामभाऊ काळे, योगगुरू किशोर थोरात, साई सेवा निधीचे विलास मुसमाडे, दत्तात्रय मुसमाडे, रावसाहेब चाचा तनपुरे, भैय्यासाहेब शेळके, शिवाजी सोनवणे, ऋषभ लोढा, रावसाहेब मुसमाडे, दत्तात्रय वाणी, दत्तात्रय दरंदले, डॉ.महेश कोहकडे, डॉ.प्रसाद ढुस, डॉ.संजय भळगट, डॉ.महेश कोहकडे, डॉ. अभिजीत वाडेकर, डॉ. राहुल पारधी,डॉ. प्रविण धोते, डॉ. नैरुत्य के. एम, डॉ. महेश जरे,डॉ. चेतन पाटील,डॉ. पंकज वर्षे, डॉ. समोर येरमाळकर,डॉ. साईप्रसाद शिंदे, डॉ. महेश बर्डे, आदीनाथ वाणी, दीपक त्रिभुवन, बाळासाहेब सोनवणे, सचिन शिंदे, बाळासाहेब मुसमाडे, विधीज्ञ बबनिश शेळके,प्रतिभा रविंद्र वामन, अशोक  मुसमाडे, विजय  डेंगळे, किरण कोळसे,सोमनाथ  वामन, चंद्रकांत कडू, नकुल  राऊत आदिंसह मान्यवर उपस्थित होते.


 सूत्रसंचालन गायत्री म्हस्के यांनी केले तर आभार डॉ.हिना यांनी मानले. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत