माजी सभापती डॉ.वंदनाताई मुरकटे यांच्या हस्ते नगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

माजी सभापती डॉ.वंदनाताई मुरकटे यांच्या हस्ते नगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- जिद्द व चिकाटी ही निर्सगाने दिलेली देणगी असुन महिलांनी त्यांच्यातील कलागुण तसेच उद्योग-व्यवसायातील आवडीचे निवडून आले...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

जिद्द व चिकाटी ही निर्सगाने दिलेली देणगी असुन महिलांनी त्यांच्यातील कलागुण तसेच उद्योग-व्यवसायातील आवडीचे निवडून आलेल्या संकटाला न  डगमगता पुढे जावे असे प्रतिपादन श्रीरामपूरच्या माजी सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी केले

राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड मार्गावरील हॉटेल जयश्री येथे नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम, आत्मजा फौंडेशन, भार्गवी मेकओव्हर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना"आशात्मजा" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.प्रसंगी सौ.मुरकुटे बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर मिस युनिवर्सल नूतन मिस्त्री , सामाजिक कार्यकर्त्या संध्या मेढे, दीपाली पुराणिक, भार्गवी मेकओव्हरच्या संचालिका भार्गवी पुराणिक आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.वंदना मुरकुटे म्हणाल्या की, महिलांनी विशिष्ट चौकटीत न राहता प्रत्येक क्षेत्रात पुढे यावे. कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही त्यासाठी संघर्ष करावाचा लागतो. संघर्षातून वाट काढून पुढे वाटचाल महिलांनी करून प्रगती साधावी असे आवाहन डॉ.वंदना मुरकुटे यांनी केले.

यावेळी मिस युनिवर्सल नूतन मिस्त्री यांनी आपल्या जीवनातील संघर्षमय चढ उतार कथन करून महिलांना मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्त्या संध्या मेढे म्हणाल्या की,  ज्‍यादिवशी स्त्रिया बोलायला लागतील तेव्‍हा त्‍यांना खरे स्‍वातंत्र्य मिळेल. पुरुषांमधील मातृत्‍व आणि स्‍त्रीमधील पितृत्‍व जेव्‍हा दिसू लागेल तेव्‍हा बदल व्‍हायला सुरुवात होईल. यावेळी सूत्रसंचालन विकास घोगरे यांनी केले तर आभार जिजाऊ प्रतिष्ठानच्या अनिताताई काळे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत