राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथील रहिवासी देविदास शिवाजी शेटे यांची पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खातेअहमदनगर कर्मचारी स...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथील रहिवासी देविदास शिवाजी शेटे यांची पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खातेअहमदनगर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होऊन संचालकपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल शेटेवाडी परिसरातील नागरिक व मित्र परिवाराच्यावतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी युवा उद्योजक पोपट शेटे, सुनील शेटे,मोहटादेवी हार्वेस्टिंगचे दीपक शेटे, जयहिंद कलेक्शनचे विक्रम मोढे, नमो नारायण ट्रेडर्सचे सचिन खांदे ,खेडकर ज्वेलर्सचे विवेक खेडकर, सिंजटा कंपनीचे व्यवस्थापक श्रीकांत शेटे आदिंसह माता-भगिनी उपस्थित होत्या.
यावेळी सर्वांच्या उपस्थित नवनियुक्त संचालक देविदास शेटे यांचा सन्मान करून भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत