राहुरीत डॉ. भूषण भळगट यांचे उद्या मंगळवारी कॅन्सर विषयी व्याख्यान व मोफत मार्गदर्शन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत डॉ. भूषण भळगट यांचे उद्या मंगळवारी कॅन्सर विषयी व्याख्यान व मोफत मार्गदर्शन

  राहुरी(वेबटीम) राहुरी येथे डॉ. भूषण भळगट यांचे कॅन्सर विषयी व्याख्यान व मोफत मार्गदर्शन राहुरीचे भूमिपुत्र आणि अहमदनगर जिल्ह्याची शान असले...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी येथे डॉ. भूषण भळगट यांचे कॅन्सर विषयी व्याख्यान व मोफत मार्गदर्शन राहुरीचे भूमिपुत्र आणि अहमदनगर जिल्ह्याची शान असलेले कॅन्सर सर्जन डॉ. भूषण संजय भळगट यांचे महिलांचे कर्करोगावरील समज व गैरसमज या विषयावर मंगळवार दि. ७ मार्च २०२३ रोजी सायं. ५.०० वा. सौ. भगिरथीबाई तनपुरे कन्या माध्य. विद्यालय, राहुरी येथे व्याख्यान आयोजित केले आले. डॉ. सौ. उषाताई प्रसादराव तनपुरे आणि सौ. सोनालीताई प्राजक्त तनपुरे यांच्या प्रेरणेने जागतिक महिला दिनानिमित्त हे व्याख्यान आयोजीत केलेले आहे.




स्त्री हा घराचा पहिला व शेवटचा पाया आहे, ती जर ढासाळली तर कुटुंबाची इमारतच खचून जाईल. म्हणून स्त्री ने तीचे स्वास्थ्य जपावे याकरिता कर्करोगाबद्दल असलेले समज व गैरसमज जाणून घेऊन स्त्रियांनी योग्य वेळी शारिरीक तपासण्या करून घेऊन कॅन्सरची शक्यता असल्यास त्याला न घाबरता सामोरे जाऊन इलाज करून घ्यावा यासाठी हे व्याख्यान आयोजीत केले आहे अशी माहिती आयोजकांनी दिली.



डॉ. भूषण भळगट हे राहुरी येथील प्रतिथयश वैद्यकिय व्यवसायीक डॉ. संजय व सौ. माधुरी भळगट यांचे जेष्ठ सुपूत्र आहेत. डॉ. भूषण यांनी शालेय व कॉलेजचे शिक्षण संपुर्णपणे मेरीटमध्ये घेऊन एम.सी.एच. आँको सर्जरी या विषयात सुपर स्पेशालिस्ट पदवी घेणारे अहमदनगर जिल्ह्यातील पहिलेच डॉक्टर आहेत. डॉ. भूषण भळगट, जीभ, जबडा घसा व थॉयरॉईड कॅन्सर, स्तन (ब्रेस्ट कॅन्सर, अन्ननलिका व पोटाचे सर्व प्रकारचे कॅन्सर, गर्भाशयाचे कॅन्सर, मुत्राशय व किडनीचे कॅन्सर, फुफुसाचे कॅन्सर, हाडांचे व मांसाचे कॅन्सर अशा सर्व प्रकारच्या कॅन्सरचे ऑपरेशन करण्यात तज्ञ आहेत. सध्या डॉ. भूषण भळगट सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नगर-पुणे रोड आणि सुर्या सह्याद्री हॉस्पिटल, शनिवार वाडा, पुणे येथे कन्सल्टंट कॅन्सर सर्जन म्हणून कार्यरत आहेत.


या व्याख्यानाच्या कार्यक्रमाबरोबरच मंगळवार दि. ७ मार्च २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत डॉ. भूषण भळगट हे डॉ. भळगट यांचे धन्वंतरी हॉस्पिटल, धान्य बाजार रोड, प्रगती शाळेजवळ, राहुरी येथे कॅन्सरग्रस्त रुग्णांची मोफत तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत.


तरी सर्वांनी डॉ. भूषण भळगट यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी व गरजु स्त्री पुरूष रूग्णांनी तपासणीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ.सौ. उषाताई प्रसादराव तनपुरे, सौ. सुजाता अरूणराव तनपुरे, सौ. राजश्री रावसाहेब (चाचा) तनपुरे, डॉ. सौ. माधुरी संजय भळगट, सौ. सोनालीताई प्राजक्त तनपुरे, सौ. सायलीताई हर्ष तनपुरे आणि राहुरी शहर व तालुक्यातील सर्व महिला मंडळ व सर्व महिला बचत गट यांचेतर्फे करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत