काँग्रेसच्या विज्ञान -तंत्रज्ञान व कौशल्य विभागाच्या अहमदनगर जिल्हाध्यपदी राजेंद्र बोरुडे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

काँग्रेसच्या विज्ञान -तंत्रज्ञान व कौशल्य विभागाच्या अहमदनगर जिल्हाध्यपदी राजेंद्र बोरुडे

  राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गुहा येथील राजेंद्र गुलाबराव बोरुडे यांचे महाराष्ट्र प्रदेश कोंग्रेस कमिटी अंतर्गत विज्ञान -तंत्रज्ञान व...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील गुहा येथील राजेंद्र गुलाबराव बोरुडे यांचे महाराष्ट्र प्रदेश कोंग्रेस कमिटी अंतर्गत विज्ञान -तंत्रज्ञान व  कौशल्य विभागाच्या अहमदनगर जिल्हाध्यपदी निवड झाली आहे. या निवडीचे पत्र माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देवळाली प्रवरा येथे प्रदान करण्यात आले.


राजेंद्र बोरुडे यांनी हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसशी एकनिष्ठ असून एनएसयुआय, युवक काँग्रेस मध्ये काम करत असताना त्यांनी अनेक पदांवर काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश कोंग्रेस कमिटी अंतर्गत विज्ञान -तंत्रज्ञान व  कौशल्य विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश यादव यांनी नगर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे.निवडीचे पत्र माजीमंत्री आ. थोरात यांच्या हस्ते देऊन शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.



यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अजय खिलारी, अमृत धुमाळ, नानासाहेब कदम, दीपक पठारे, कृष्णा मुसमाडे, युवक काँग्रेसचे कुणाल पाटील, शुभम पाटील, मयुर अडागळे, विलास संसारे, बाबासाहेब संसारे आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत