गुहाचे निसारभाई पठाण यांची भाजप किसान मोर्चाच्या उत्तर नगर जिल्हाउपाध्यक्षपदी निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गुहाचे निसारभाई पठाण यांची भाजप किसान मोर्चाच्या उत्तर नगर जिल्हाउपाध्यक्षपदी निवड

राहुरी(प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील गुहा येथील सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले निसारभाई हसनभाई पठाण यांची भारतीय जनता पा...

राहुरी(प्रतिनिधी)



राहुरी तालुक्यातील गुहा येथील सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले निसारभाई हसनभाई पठाण यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.


   भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे यांनी निसारभाई पठाण यांच्या कार्याची दखल घेऊन ही निवड केली असून राज्याचे महसुलमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते नियुक्ती प्रदान करण्यात आले.



यावेळी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष भगत, राहाता तालुका संघटक मुनीर शेख, संपत वाघ, लौलेश लोखंडे, किरण गुंजाळ, महेश सुरडकर, राजन ब्राम्हणे , महेश कांबळे,प्रतीक खरात आदी उपस्थित होते.


या निवडीचे ना.राधाकृष्ण विखे, खा.डॉ.सुजय विखे, जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे, माजी आ.शिवाजीराव कर्डिले, माजी आ.चंद्रशेखर कदम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम आदींनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत