श्रीरामपूर(वेबटीम) शिक्षकांनी आपल्या सेवानिवृत्ती नंतर कुटुंबाला वेळ दिला पाहिजे. त्याच बरोबर आपण त्या समाजातून आलो आहोत. त्या समाजाचे ऋण फे...
श्रीरामपूर(वेबटीम)
शिक्षकांनी आपल्या सेवानिवृत्ती नंतर कुटुंबाला वेळ दिला पाहिजे. त्याच बरोबर आपण त्या समाजातून आलो आहोत. त्या समाजाचे ऋण फेडण्यसाठी वेळ दिला पाहिजे. असे अवाहन अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिल्ले यांनी केले आहे.
श्रीरामपूर येथील महाराष्ट्र सेवा मंडळ, श्रीरामपूर संचलीत प्रेमजी रतनसी पटेल हायस्कुल मधील क्रीडा शिक्षक अनिल पटारे व याच संस्थेचे शंकरराव सतोबा डावखर कन्या विद्यालयाचे प्रयोगशाळा परिचर सुधाकर कारभारी बागुल यांच्या संयुक्त सेवापूर्ती सोहळ्या प्रसंगी अध्यक्ष पदावरून त्या बोलत होत्या. शिक्षकांनी आयुष्यभर नोकरी करून आपल्या घरातील कुटुंबीयांचे पालन पोषण करून जबाबदारी पार पाडलेली असते, मात्र सेवा निवृत्तीच्या आयुष्यात समाजाच्या जागृतीसाठी वेळ दिला पाहिजे असे त्या म्हणाल्या. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष्यांनी आपल्या तिनही मुली याच शाळेत शिकून उच्चपदावर गेल्याचे आवर्जुन सांगितले. यावेळी सेवा निवृत्त सेवकांचा संस्थेच्या वतीने मानपत्र व स्नेह वस्त्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. सेवा निवृत्त सेवकांनी या पुढेही गरज पडेल तेव्हा शाळेला सेवा द्यावी असे अवाहन अभयशेठ बाफना यांनी केले. या प्रसंगी सेवानिवृत्त सेवकांच्या वतीने महाराष्ट्र सेवा मंडळ शैक्षणीक संकुलातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना स्नेहभोजन दिले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष संजयराव फंड, विश्वस्त करण ससाणे, भिमजीभाई पटेल, राजेंद्र डावखर, संजीव आगाशे, उदय क्षिरसागर, अनिल कांबळे, नारायणराव डावखर आदिनी कौतुक केले आहे. या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष विजयराव शिंदे, सह सेक्रेटरी तात्यासाहेब खलाटे, उपाध्यक्ष अभयशेठ बाफना इ. उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अजय पवार, ज्ञानेश्वर खुरंगे, सुगंधराव इंगळे, एल. एन. म्हस्के, प्रायार्य मरभळ, पी.डी सावंत, अण्णा झिने, किशोर संचेती, प्रभाकर जऱ्हाड व सेवानिवृत्त सेवकांचे कुटुंबीय व नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तीनही विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी परीश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नानासाहेब मेहेत्रे यांनी केले. मानपत्राचे वाचन श्रीमती बोधक व राजेंद्र हिवाळे यांनी केले तर आभारप्रदर्शन नारायणराव पवार यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत