कणगरच्या शेतकऱ्यांनी ७ वर्षापूर्वी अनामत रक्कम भरूनही वीज कनेक्शन नाही.. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कणगरच्या शेतकऱ्यांनी ७ वर्षापूर्वी अनामत रक्कम भरूनही वीज कनेक्शन नाही..

 देवळाली प्रवरा(वेबटीम) महावितरण कडून शेतीसाठीच्या विज कनेक्शन साठी अनामत रक्कम भरुन अनेक दिवस झाले तरी विज कनेक्शन अद्याप पर्यंत मिळाले नसत...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



महावितरण कडून शेतीसाठीच्या विज कनेक्शन साठी अनामत रक्कम भरुन अनेक दिवस झाले तरी विज कनेक्शन अद्याप पर्यंत मिळाले नसतांना मात्र महावितरणने विज बिल सुरु केल्याने कणगर ता.राहुरी येथिल शेतकरी संत्पत झाले असून आधी विज कनेक्शन सुरु करा अन्यथा महावितरण विरोधात तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा गोरक्षनाथ दूधाडे,मिनीनाथ गाढे व चंद्रभान घाडगे या शेतकऱ्यांनी दिला आहे.


   या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महावितरणने आमच्या कडून २०१४ - १५ सालीअनामत रक्कम भरून घेतली. आमची कन्स्ट्रक्शन कामे करण्यासाठी इजेंसी नेमली. मात्र सदर एजन्सीने आमचेकडून कोणत्याही प्रकारचे पोल न टाकता कंडक्टर न टाकता न केलेले काम दाखवून अधिकाऱ्यांचे संगनमताने बिले काढून घेतले. व आम्हास विजेपासून वंचित ठेवले . आम्ही गेली ७ ते ८ वर्ष आपल्या कंपनीकडे पाठपुरावा करूनही आमची कामे करून दिली नाही आम्हास पाणी असूनही वीज नसल्याने पिके घेता येत नाही.आम्हास येत्या १५  दिवसात कामे पूर्ण करून न दिल्यास व ज्यांनी  बोगस कामे दाखवून भ्रष्टाचार केले त्यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही आमच्या गावातील शेतकऱ्यांसह आपल्या कार्यालयासमोर कधीही आंदोलन सुरू करू असा इशारा निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे. आंदोलनाच्या प्रती संबधीतांना पाठविण्यात आल्या असून आंदोलना वेळी काही प्रकार घडल्यास कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी संबधीतांवर राहील असे म्हटले आहे. 

                    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत