पानेगांव (वार्ताहर) (ता.नेवासे) पानेगांवचे लोकनियुक्त सरपंच संजय जंगले आपल्या मित्रांन बरोबर छत्रपती चौकात उभे असताना शिर्डी लोकसभेचे खासद...
पानेगांव (वार्ताहर)
(ता.नेवासे) पानेगांवचे लोकनियुक्त सरपंच संजय जंगले आपल्या मित्रांन बरोबर छत्रपती चौकात उभे असताना शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे आपल्या ताफ्यासमवेत थांबले यावेळी तेथेच चहा पाणी झाला विविध विकास कामांवर चर्चा सरपंच जंगले यांनी आमदार शंकरराव गडाख तसेच सभापती सुनिलभाऊ गडाख गांवच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध केल्याने गावात भक्तनिवास,रस्ते,नूतन ग्रामपंचायत कार्यालय वाड्या वस्त्यावर पाणी ,जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा,त्याच बरोबर अंतर्गत रस्ते,जिल्ह्यात पानेगांवच नांव पोहचले असं अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक झाले.हे सर्व आमदार शंकरराव गडाख यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने शक्य झालं म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पानेगांवचा विकास झाला. यावेळी खासदर लोखंडे यांनी सांगितले की, आमदार गडाख हे विकास कामाच्या बाबतीत नेहमीच अग्रभागी असतात तालुक्यातहि मोठे विकासकामे मार्गी लावल्याचे दिसून आले.त्यामुळे मी सुद्धा तातडीने पंधरा लाखाचा निधी पानेगांवासाठी मंजूर करतो. त्याच बरोबर आणखी हि निधी उपलब्ध करून देणार असल्याचं खासदार लोखंडे यांनी सांगितले.यावेळी टाळ्यांच्या गजरात त्यांच स्वागत केले.
खासदार लोखंडे यांनी माॅडेल व्हिलेज म्हणून भविष्यात पानेगांवचा निश्चित निर्माण होईल माझ्या मतदार संघातील विकासाभिमुख गांव म्हणून मला नक्कीच अभिमान असल्याचं खासदार लोखंडे यांनी सांगितलं.
यावेळी सरपंच संजय जंगले यांनी सांगितले की पानेगांव येथील छत्रपती चौकातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा समोरील सुशोभीकरणासाठी दहा लाख त्याच बरोबर स्मशानभूमी येथे पाच लाख रुपये पेव्हर ब्लॉक कामाला हि प्रत्यक्षात सुरुवात हि झाली असल्याचं सरपंच जंगले यांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, पानेगांवचे भूमिपुत्र उद्योजक अॅड सुभाषराव जंगले, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय पाटील घोलप, उपसरपंच रामराजे जंगले, मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, पोपटराव पाटील संस्थेचे अध्यक्ष रमेश गुडधे,माजी सरपंच बाळासाहेब जंगले,हभप ज्ञानदेव महाराज गुडधे, अंमळनेर माजी सरपंच लक्ष्मण माकोणे, संदिप जंगले कर्णासाहेब जाधव, डॉ तुवर राहुल जंगले, मोहनराव जंगले आदींसह मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत