आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या वाढदिवसानिमित्ताने - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या वाढदिवसानिमित्ताने

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शनिवार ...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शनिवार दि.१ एप्रिल रोजी देवळाली प्रवरात विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहे. सुरेंद्र भाऊ थोरात मित्र मंडळाच्यावतीने विवीध उपक्रम राबविण्यात येणार आहे.


 देवळाली बाजार तळावर उद्या शनिवारी सकाळी ९ वा. मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मा वाटप, रक्तदान शिबिर तर  दुपारी ११ वा. ह.भ.प. नितीन महाराज सावंत (परभणी) यांचे कीर्तन होणार आहे.तर दुपारी २ वा. समस्त देवळाली करांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


 दरम्यान सायं. ६ वा. सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त  देवळाली प्रवरा सोसायटी चौक ते बाजारतळ या ठिकाणावरून मिरवणूक निघणार आहेत.तर  सायं. ७ वा. देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील महिलांसाठी पैठणी साड्यांचे वाटप करण्यात येणार आहेत. रात्री ८ वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार समारंभ व मान्यवरांचे मनोगत व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


 दरम्यान या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे महसूल व पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, शालिग्राम होळकर, एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, आरपीआयचे राज्य संपर्कप्रमुख श्रीकांतजी भालेराव,आरपीआयचे राज्याचे सचिव विजयराव वाकचौरे, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड, आरपीआय राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, विभाग जिल्हाध्यक्ष आरपीआय भीमाभाऊ बागुल, आरपीआय राहुरी तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे, अहमदनगर युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे,आदींसह पोलिस उपाध्यक्ष संदीप मिटके, तहसीलदार फसीयोद्दिन शेख, पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.


  कार्यक्रमास परिसरातील नागरिक  व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुरेंद्र भाऊ थोरात मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत