राहुरी फॅक्टरीच्या अश्विनी उंडे ठरल्या 'होम मिनिस्टर'च्या विजेत्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीच्या अश्विनी उंडे ठरल्या 'होम मिनिस्टर'च्या विजेत्या

  देवळाली प्रवरा(वेबटीम) जागतिक महिलादिनानिमित्त सालाबादप्रमाणे देवळाली प्रवरा येथे सत्यजित कदम फाउंडेशनच्यावतीने राहुरी फॅक्टरी येथील वृंदा...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



जागतिक महिलादिनानिमित्त सालाबादप्रमाणे देवळाली प्रवरा येथे सत्यजित कदम फाउंडेशनच्यावतीने राहुरी फॅक्टरी येथील वृंदावन कॉलनी येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा महिलांसाठी अनोखा कार्यक्रम पार पडला.



 प्रीतिताई सत्यजित कदम यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या कार्यक्रमास शहरातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महिला दिनानिमित्त सत्यजित कदम फाउंडेशनच्यावतीने फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून राहुरी फॅक्टरी आणि देवळाली प्रवरा परिसरामध्ये महिलांची मोठी वाहन रॅली काढण्यात आली.


 भगवे फेटे परिधान करून मोठ्या संख्येने माता-भगिनी रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या संध्याकाळी वृंदावन कॉलनी येथे रमेश परळीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.


डॉ प्रेरणा शिंदे,डॉ मनीषा ढुस,डॉ सुचेता कुलकर्णी,डॉ अमृता गव्हाणे,शिल्पा आव्हाड ,वर्षा बारटक्के, जानव्ही धुत, ज्योतीदीदी या विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांच्या  हस्ते दीप प्रजवलन करून सुरवात करण्यात आली.




या कार्यक्रमांमध्ये देखील हजारो महिलांनी मोठा सहभाग घेऊन खेळाचा आनंद लुटला. यावेळी श्रीराम प्रतिष्ठाण ढोल ताशा ध्वज पथक देवळाली व राहुरी येथील तरुण व तरुणींनी सर्वांची मने जिंकली.


  या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या २१ हजार रुपयांच्या पैठणीच्या अश्विनी उंडे  ह्या मानकरी ठरल्य असून त्यांना ही पैठणी बक्षीस देण्यात आली. तसेच मानसी सचिन तारडे, माधुरी अनिल देवकर, डॉ। रेणुका घुगरकर, भाग्यश्री शिवाजी तारडे आदी अंतिम फेरीत पोहचलेल्या महिलांना देखील पैठणी देण्यात आली व इतर भाग घेणाऱ्या सगळ्या महिलांना अनेक पारितोषिके देण्यात आले तसेच फाऊंडेशन मार्फत शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या ४८ विद्यार्थ्यांचा त्यांच्या मातेसह सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


 तसेच गावातील गृहिणीसाठी कै प्रिया चंद्रशेखर कदम यांच्या नावे उत्कृष्ट सासू-सून पुरस्कार देण्यात आला.


 त्यामध्ये श्रीमती लक्ष्मी विष्णू चोळके व सौ नलिनी सुनील चोळके,श्रीमती प्रीतिभा अशोक झिने व सौ शीतल मनोज झिने,सुमन शांताराम आहेर व सौ रोहिणी सुभाष आहेर या तीन सासू सुनांच्या जोडीला सन्मानित करण्यात आले.




 कार्यक्रमासाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, बागायत पीक सोसायटी उपाध्यक्ष मच्छीन्द्र कदम, सोसायटी चेअरमन संतोष चव्हाण, माजी चेअरमन शहाजी कदम,  डॉ.गव्हाणे, डॉ मैड, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, सचिन कोठुळे,सचिन शेटे, सतीश वने,भारत शेटे,अमोल कदम, सचिन सरोदे, संदिप कदम,  रामेश्वर तोडमल, प्रशांत कोठुळे, अविनाश मुसमाडे, गणेश भांड सर, चेतन कदम, मंगेश ढुस, माजी नगरसेविका सुजाता कदम,अंजली कदम,संगीता चव्हाण,उर्मिला शेटे तसेच परिसरामध्ये सामाजिक धार्मिक आरोग्य शैक्षणिक विधी क्षेत्रांमधील महिला या ठिकाणी उपस्थित होत्या  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्यजित कदम फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत