शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देवळाली प्रवरात शिवजयंती साजरी. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देवळाली प्रवरात शिवजयंती साजरी.

देवळाली प्रवरा/वेबटीम:-       आज देवळालीप्रवरा येथे शिवाजी चौकामध्ये  शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्य...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-

      आज देवळालीप्रवरा येथे शिवाजी चौकामध्ये  शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शिवाजी चौकांत शिवाजी महाराजांचे विधीवत पुजन करुन श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. 

   यावेळी डीजे तसेच मिरवणुक आदि विषयाला फाटा देवुन गरजु महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते श्री अजित पाटील कदम होते. 

      कार्यक्रमाचे प्रास्तावीक शिवसेना नेते श्री दत्ता कडुपाटील यांनी केले.आपल्या प्रास्तविकांत त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र राज्य देश नाही तर जगाला आदर्श असे होते.त्यांचे विचारांपासुन प्रेरणा घेत नितीवान तसेच चांगला समाज घडविण्याची प्रेरणा आजच्या जयंतीच्या दिवशी घ्यावी. असे त्यांनी नमुद केले. 

      आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री अजित कदम यांनी सध्याचे राजकिय घडामोडीचा आढावा घेत महाविकास आघाडीने एकत्र जात सुराज्य आणण्याचे आव्हान केले याप्रसंगी म्हाडाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव ढवळे , प्रा सतीश राऊत ,वंचीत आघाडी पक्षाचे तालुका प्रमुख श्री संतोष चोळके,यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरवपर विचार व्यक्त केले. शहरप्रमुख श्री अनिल चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. 

      याप्रसंगी राष्ट्रवादी शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण,क्रॅाग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री बाळासाहेब खांदे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री भागवत मुंगसे , बाबासाहेब मुसमाडे राहुरी बाजारसमीती संचालक श्री गणेशदादा खेवरे, राहुरी तालुका उपप्रमुख सचिन म्हसे,किशोर थोरात, प्रशांत काळे ,कुमार भिंगारे ,विजय कुमावत ,बाबा खंडागळे ,चंद्रकांत दोंदे ,मनीष देठे, प्रसाद मुसमाडे आदिसह मोठ्या संख्येने महिला भगिनी व शिवप्रेमी उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत