चिंचविहिरे ग्रामपंचायत पठारेंना धक्का ,अविश्वास ठराव मंजूर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चिंचविहिरे ग्रामपंचायत पठारेंना धक्का ,अविश्वास ठराव मंजूर

  राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यात राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या असणाऱ्या चिंचविहिरे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच स्वाती बाबासाहेब पठारे य...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यात राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या असणाऱ्या चिंचविहिरे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच स्वाती बाबासाहेब पठारे यांच्यावर  ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव ७ विरुद्ध १ मतांनी मंजूर करण्यात आला आहे.



         तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांच्या उपस्थितीत आज दि. २ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता ग्रा.पं. कार्यालय चिंचविहिरे येथे सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली यावेळी सदर ठराव संमत करण्यात आला. ग्रामपंचायतचे एकूण ९ सदस्य आहेत. त्यापैकी  सुधीर झांबरे, भगीरथ नरोडे, प्रतिभा गिते, सुवर्णा पानसंबळ, शितल धामोरे, पुष्पा गीते, सुनील साळवे या ७ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने कौल दिला तर १ सदस्य संजय नरोडे हे अनुपस्थित होते तर सरपंच स्वाती पठारे या हजर होत्या. दरम्यान अविश्वास ठराव संमत झाल्याने आता पुढील सरपंच कोण होणार. कोणत्या गटाला प्राधान्य मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे.


दरम्यान यावेळी मारुती नालकर,  भूषण नालकर, दादाभाऊ सरोदे आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत