राहुरी फॅक्टरी येथे श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथे श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील सर्व सामाजिक धार्मिक मंडळ, सर्व पतसंस्था, सर्व राजकीय पक्ष यांनी एकत्रित येऊन राम नवमी  उत्सव...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील सर्व सामाजिक धार्मिक मंडळ, सर्व पतसंस्था, सर्व राजकीय पक्ष यांनी एकत्रित येऊन राम नवमी  उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला.

सायंकाळी ६ वाजता प्रसाद नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजा आरती करून तसेच श्री हनुमान मंदिरात उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते  बजरंग बली हनुमंताची आरती  करून शोभायात्रेला प्रारंभ झाला.

या शोभायात्रेत तरुणांची व महिला भगिनींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. या शोभायात्रेत सहभागी महिला भगिनींनी डिजे वाद्यांच्या ध्वनीक्षेपकामधील धार्मिक गाण्यावर नाचण्याचा आनंद ही लुटला. 

या शोभायात्रेत प्रभु श्री राम, सितामैया, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमान, जटायू, जांबुवंत यांच्या धर्म रथाचे मुख्य आकर्षण होते.

शोभा यात्रा मार्गावर सर्व महिला भगिनींनी प्रभु श्री राम, सितामैया, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमान, जटायू, जांबुवंत यांची पुजा करुन दर्शन घेतले.

शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराजांची आरती करून कारखाना कॉलनी, अंबिका नगर, या मार्गावरून कराळेवाडी येथील श्री हनुमान मंदिरात श्री राम रक्षा मंत्र, श्री हनुमान चालीसा पठण करुन प्रसाद वाटप सांगता करण्यात आली. त्यानंतर ही महिलांनी फेर धरून नाचण्याचा व फुगडी खेळण्याचा आनंद पुन्हा लुटला.

प्रभु श्रीरामांच्या भुमिकेत चि.ऋषिकेश  धनंजय थोरात, सितामैयाच्या भुमिकेत कु अदिती राजू कदम, लक्ष्मण च्या भुमिकेत चि प्रथमेश धनंजय थोरात, भरताच्या भुमिकेत चि अक्षय उदय पठारे, शत्रुघ्न च्या चि यश सदा शिंदे , हनुमंताच्या भुमिकेत चि कार्तिक दत्तात्रय गागरे जटायू च्या भुमिकेत चि ओम किशोर साठे, जांबुवंताच्या भुमिकेत चि अक्षय पवार या श्री राम नवमी उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्व श्री राम भक्तांनी सहभागी होऊन शोभायात्रेची शोभा द्विगुणित केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत