धार्मिक,सामाजिक कार्यात पानेगांवच्या महिलांच योगदान मोठे - उषा गडाख - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

धार्मिक,सामाजिक कार्यात पानेगांवच्या महिलांच योगदान मोठे - उषा गडाख

  पानेगाव(बाळासाहेब नवगिरे)  धार्मिक सामाजिक कार्यात पानेगांवच्या महिलांच योगदान मोठं असल्याचं गौरवोद्गार सौ.उषाताई सुनिल गडाख यांनी  नेवासे...

 पानेगाव(बाळासाहेब नवगिरे)



 धार्मिक सामाजिक कार्यात पानेगांवच्या महिलांच योगदान मोठं असल्याचं गौरवोद्गार सौ.उषाताई सुनिल गडाख यांनी  नेवासे तालुक्यातील मुळाथडी पंचक्रोशीतील पानेगांव येथे ५७वा अखंड हरिनाम सप्ताहाचा सदिच्छा भेटीदरम्यान काढले. या कार्यक्रमात  महिला संगित खुर्ची, रांगोळी, विद्यार्थ्यांनसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी सौ.उषाताई सुनिल गडाख यांनी स्वतः भाग घेवून संगित खुर्चीचा आनंद लुटला. व सुबक रांगोळी हुबेहूब देवदेवतांचे, चित्र त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज रेखाटलेली रांगोळी लक्ष वेधून घेतले. 



यावेळी त्यांनी सांगितले की कुठलाही धार्मिक सामाजिक कार्यक्रम आयोजित केला तर त्याची सुरुवात रांगोळी पासून होते. ती कला महिला मुलींन कडे अवगत असते. असा प्रकारे प्रत्येक दिनक्रम बरोबरच महिलांना शेती त्याच बरोबर घरची कामात नेहमीच व्यस्त असल्याने वेळ मिळत नाही.असा वेळेस गावात धार्मिक सामाजिक कार्यात सहभागी झाल्यास विरंगुळा बरोबर मोठ्या प्रमाणावर महिला एकत्र आल्यास विचारांची देवाणघेवाण होते. नक्कीच आपल्या संसाराचा गाडा आनंदीमय झाल्याशिवाय राहत नाही. आपलं भाग्य आहे.हरिनामाच्या सप्ताहात संगित खुर्चीच्या निमित्ताने एकत्र आलो असल्याचं सौ गडाख यांनी सांगितले.

संगित खुर्ची विजेते मुलांन मध्ये चैतन्य दत्तात्रय जंगले, मुलींमध्ये समिक्षा ज्ञानेश्वर कटारे, महिला विजेता सौ.मंगल लेंडे, पुरुषांमध्ये स्वतः लोकनियुक्त सरपंच संजय जंगले हे हि संगित खुर्चीत हि विजेते ठरले. 

यावेळी सौ.दिपाली नवगिरे यांनी सौ.गडाख यांना पानेगांवच्या विकासाची माहिती देवून विकासामध्ये नामदार शंकरराव गडाख यांचा मार्गदर्शनाखाली सभापती सुनिलभाऊ गडाख यांचा योगदान मुळे शक्य झालं.गावात छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ पुतळा त्याच बरोबर भक्तनिवास, नूतन ग्रामपंचायत कार्यालय ,गावातील विकास कामामुळे पानेगांवचं नांव जिल्ह्यात ओळख निर्माण झाली. 

कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या रतनकाकू जंगले,सौ.जयश्री गडाख, खेडकर मॅडम, सौ,स्वाती चिंधे, सौ.संगिता जंगले सौ.सुनिता सोनवणे, सौ.मनिषा जंगले सौ. छाया जंगले सौ.सविता खडके, सौ.चंद्रकला गुडधे, सौ.रोहिणी जंगले, सौ. प्रमिला जंगले सौ.मिराबाई जंगले पारायण कमिटीचे हभप ज्ञानदेव गुडधे, भाऊसाहेब काकडे,रघूनाथ जंगले, द्वारकानाथ चिंधे, एकनाथ जंगले, मच्छिंद्र जंगले, नानासाहेब जंगले, शिक्षक बाळासाहेब जावळे, विष्णु दहिफळे, मच्छिंद्र खेमनर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तुकाराम चिंधे,विजय जंगले,भारत जंगले, रमेश जंगले,पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, डॉ तुवर, निवृत्ती जंगले, बाळासाहेब कल्हापुरे जालिंदर जंगले, सुनिल चिंधे, फ्रांन्सिंस वाघमारे महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे  आदींसह मान्यवर उपस्थित होते सुत्रसंचालन पुरुषोत्तम आंधळे यांनी आभार संजय गागरे यांनी मानले.

 धार्मिक सामाजिक कार्यात प्रत्येकांचा कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम सोनई येथे सुनिता गडाख यांचा मार्गदर्शनाखाली राबविला होता.त्याच पद्धतीने उषाताईंचा मार्गदर्शनाखाली पानेगांव अखंड हरिनाम सप्ताहात घेतला महिला भगिनींनी रांगोळी स्पर्धा संगित खुर्ची सहभागी झाल्या आनंद वाटला त्याच बरोबर मुला- मुलींनी निबंध स्पर्धेत सहभागी झाले
 लोकनियुक्त सरपंच  संजय पाटील जंगले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत