राहुरीफॅक्टरी व कणगर येथील अवैध मुरूम उतखन्न बंद करण्यासाठी आरपीआय महिला आघाडीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीफॅक्टरी व कणगर येथील अवैध मुरूम उतखन्न बंद करण्यासाठी आरपीआय महिला आघाडीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू

  राहुरी (प्रतिनिधी) राहुरी तालूक्यातील कणगर, राहुरी कारखाना व एमआयडीसी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक सुरू आह...

 राहुरी (प्रतिनिधी)



राहुरी तालूक्यातील कणगर, राहुरी कारखाना व एमआयडीसी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक सुरू आहे. महसूल व पोलिस प्रशासन या अवैध गौण खनिज उत्खननावर कोणतीही कारवाई करत नसल्याने आता आरपीआय च्या स्नेहल सांगळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आवाज उठवीत आजपासून तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.


          महसूल प्रशासन तसेच श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांना आरपीआय च्या महिला आघाडी तालूकाध्यक्षा स्नेहल सांगळे यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते. राहुरी तालूक्यातील कणगर, राहुरी कारखाना व एमआयडीसी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध गौणखनिज उत्खनन राजरोसपणे चालू आहे. मुरुम, खडी यांची कोणत्याही प्रकारची रॉयलटी भरलेली नसतांनाही गौणखनिज माफिया दिवस-रात्र अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक करत आहेत. त्यामुळे जनसामान्य जीवन विस्कळीत होत आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे आदेशाने गौण खनिज उत्खनन व वाहतूक बंदी असतांनाही कणगर, राहुरी कारखाना, एमआयडीसी परिसरात सर्व आदेश धाब्यावर ठेऊन गौणखनिज उत्खनन व वाहतूक आजतागायत चालू आहेत.

           सदर गौण खनिज उत्खनन व वाहतूकीला आळा घालण्याची जबाबदारी येथील तहसीलदार यांनी घ्यावी. सदर उत्खनन हे १२ तासांचे आत बंद न झाल्यास उपोषण करण्यात येईल असे निवेदनात म्हटले होते. मात्र महसूल प्रशासनाने निवेदनाची कोणतीही दखल न घेतल्याने आज दिनांक १४ ‌मार्च रोजी तहसील कार्यालया समोर उपोषण सुरू करण्यात आले. जो पर्यंत मुरूम उत्खनन बंद होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार असा पवित्रा महिलांनी घेतलाय. 

              यावेळी प्रियंका सगळगीळे, कवीता पवार, उषा ठाकूर, कमल साबळे, आरती ठाकूर, रुकसाना पटेल, नंदा मांजरे, मीना शिरसागर, मंगल ससाणे, मंदा मापारे, नवसाबाई मापारे, अपसाना सय्यद, आमिशा सय्यद, अनुसया मोरे, बिजला मापारे, मीरा साळवे, ताराबाई औटी, वंदना जाधव, शुभांगी नरवडे, छाया पाळंदे, हिरा पंडित, मंदा साळवे, सिंधूबाई पवार, रेखा पोपळघट, छाया गुंजाळ, अर्चना धनवटे, शबाना पठाण, ठकुबाई भगत, सरला भगत, आसराबाई जाधव, स्नेहल दिवे आदि महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत