जुन्या पेन्शनसाठी आरएमबीकेएस कर्मचारी संघटना आक्रमक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जुन्या पेन्शनसाठी आरएमबीकेएस कर्मचारी संघटना आक्रमक

श्रीरामपूर(वेबटीम)  राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियनच्या महाराष्ट्रराज्य शाखेने विविध मागण्यांसाठी दिनांक 13 मार्च रोज...

श्रीरामपूर(वेबटीम)



 राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियनच्या महाराष्ट्रराज्य शाखेने विविध मागण्यांसाठी दिनांक 13 मार्च रोजी धरणे आंदोलन व 14 ते 18 मार्च  पाच दिवस काळी पट्टी बांधून काम करणेबाबत आंदोलनाचे हत्यार हत्यार उपसले आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या शासकीय, निम शासकीय व खाजगी  क्षेत्रात कर्मचारी, अधिकारी यांच्या वेगवेगळ्या शाखा असून असंख्य सदस्य आहेत. त्यामुळे दिनांक 13 मार्च ते दिनांक 18 मार्च 2023 पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या 358 तालुक्यात महाराष्ट्र राज्याच्या सेवेतील 2005 नंतरच्या व केंद्र शासनाच्या सेवेतील 1 जानेवारी 2004 नंतरच्या सरकार निमसरकारी व खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजन लागू करावी,  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे संपूर्ण खाजगीकरण व उदारीकरण स्वरूपाचे केले असून यामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ठेवली आहे. सदर शैक्षणिक धोरण महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात येऊ नये. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राष्ट्रीय स्तरावर रद्द करण्यात यावे, पूर्वीचे कामगार कायदे हे कामगार-कर्मचारी यांच्या हिताचे असतांना केंद्र सरकारने ते रद्द करून चार कामगार संहिता लागू केल्या आहेत त्यामुळे कर्मचारी कामगारांचे खूप मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात चार कामगार संहिता लागू करण्यात येऊ नये व राष्ट्रीय स्तरावर या चार कामगार संहिता रद्द करावेत या आणि आदी विषयाच्या अनुषंगाने एक दिवसाचे धरणे आंदोलन व पाच दिवसाची काळी फीत आंदोलन करण्याचा कार्यक्रम निर्धारित केलेला आहे. यावेळी प्रशासनाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनी निवेदन स्वीकारले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत