जिल्हा बँकेत राष्ट्रवादीची चार; काँग्रेसचे एक मत फुटलं? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्हा बँकेत राष्ट्रवादीची चार; काँग्रेसचे एक मत फुटलं?

 नगर : वेबटीम     जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीचे चंद्रसेखर घुले यांचा पराभव करत माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी बँक भा...

 नगर : वेबटीम   

 जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीचे चंद्रसेखर घुले यांचा पराभव करत माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी बँक भाजपच्या ताब्यात आणली. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीची चार आणि काँग्रेसचे एक मत फुटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे ही मते जयंत पाटील यांच्या गटाची नसून ती अजित दादांची असल्याचीही चर्चा आता लपून राहिलेली नाही.त्यामुळे हे कसं घडलं, यावर मंथन केले जात आहे.                                                                         जिल्हा बँकेत महाविकास आघाडीची सत्ता होती. उदय शेळके यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर बुधवारी निवडणूक झाली, यात घुले व कर्डीले थेट सामना झाला, घुलेंकडे 14, तर कर्डीलेकडे 6  मते होती, मात्र निकालात कर्डीले यांना 10, तर घुलेना 9 मते मिळाली, एक मत बाद झाले, घुले एका मताने पडले, आणि चर्चा सुरू झाली ती, 14 पैकी ती चार मते कोणाची फुटली, एक बाद मत जाणीवपूर्वक टाकण्याची खेळी कोणाची? आणि हो, याचे तर्कपूर्ण असे उत्तरही मिळाले.                                        अजित पवारांनी या निवडणुकीत लक्ष घातले होते. जिल्ह्यात जयंत पाटील यांचे वर्चस्व वाढलेले आहे. तनपुरे, घुले, काळे, गडाख, थोरात असे सोयरे धायरे आहेत, महत्वाच्या पदांवरील निवडीवेळी लॉबीची ताकद पहायला मिळाली, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद, झेडपी उपाध्यक्ष, अध्यक्ष पद, शिर्डी संस्थान अध्यक्ष, आता जिल्हा बँक, पुढे विधानपरिषद या ठिकाणीही घुले याांचच दावा होताच, दुसरीकडे राष्ट्रवादीत बँकेसाठी भानुदास मुरकुटे, राहुल जगताप, सीताराम गायकर आदी इच्छुक होते, असे असताना घुले हे 'सोधा' मुळे वरचढ ठरू पाहत असल्याने त्यामुळे कुठे ना कुठे अंतर्गत नाराजी वाढू लागली होती. त्याचाच विस्फोट बँकेच्या कालच्या निवडणुकीत झाल्याचे दिसले. राष्ट्रवादीची मते फुटली हे लपून राहिलेले नाही, मात्र ही मते केवळ नाराज आहेत म्हणून फुटले असेही नाही, त्याला शुगर लॉबी ही दुसरी किनारही आहेच. केंद्रात- राज्यात भाजपची सत्ता आहे. तयामुळे आपल्या अडचणीत सापडलेल्या कारखान्यांना वाचविण्यासाठी 'त्या' लोकांनी मंगळवारी रात्री 9 नंतर देवेंद्र यांचा शब्द घेतल्यानंतर ही मते दुसऱ्या दिवशी कर्डीले याना टाकल्याचे सूत्रांकडून समजते. यात खासदार सुजय विखें पाटील व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे किंगमेकर ठरलेले आहेत. जे फुटले त्यांना आता जिल्हा बँकेतून आर्थिक मदत होईलच, शिवाय चौकशीचा ससेमिराही मागे लागणार नसल्याने हे पाऊल काही लोकांनी उचलले आहे. यात उत्तरेतील एक युवा संचालकही फुटला आहे, त्याचे नाव कर्डीले यांनी बोलता बोलता सांगून टाकले आहे, आणि विशेष म्हणजे तो अजित पवार त्यांच्या गटाचा समजला जातो. असो, बँकेची ही निवडणूक राज्याचे लक्ष वेधनारी ठरली, विखें पिता पुत्रांनी मोठी कामगिरी बजावली, त्यांचे राज्यात वजन वाढणार आहे, तर दुसरीकडे पायात पाय घालून चाललेली राष्ट्रवादी व काँग्रेस अस्थिर झाली आहे. अजितदादा व बाळासाहेब थोरात यांनी 14 संचालकांची आईबीवर मंगळवारी बैठक घेऊनही बुधवारी सकाळी यातील 5 मते फुटतात, हे विशेष आहे, अजितदादांना नेहमीच इतर पक्षातील बंडखोरी अगोरदच समजते, मग नगरची ही नाराजी त्यांना हेरता आली नाही का? या विषयी चर्चा तर होणारच आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत