दवणगावच्या उपसरपंचपदी अर्चना होन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दवणगावच्या उपसरपंचपदी अर्चना होन

आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील भारतीय जनता पक्ष प्रणित मौजे दवणगाव  ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अर्चना भरत होन यांची बिनविरोध निवड करण्यात...

आंबी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील भारतीय जनता पक्ष प्रणित मौजे दवणगाव  ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अर्चना भरत होन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 


सोमवारी (दि. १३) दवणगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच शितल भाऊसाहेब खपके यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडलेल्या बैठकीत होन यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच गोकुळदास साळुंके यांनी उपसरपंच पदाची सूचना मांडली तर सदस्य प्रदिप भोसले यांनी त्यास अनुमोदन दिले.

यावेळी सरपंच शितल भाऊसाहेब खपके, सामाजिक कार्यकर्ते मेजर भाऊसाहेब खपके, माजी उपसरपंच गोकुळदास  साळुंके, सदस्य प्रदीप  भोसले, सुमन  मोहटे, शिवाजी  खपके, राजेंद्र खपके, सुवर्णा होन, भाऊसाहेब मोहटे, भरत होन, शिवाजी होन, दादासाहेब खपके, संतोष होन, नानासाहेब पांडागळे, प्रभाकर होन, दिलीप होन, अशोक होन, रवींद्र होन, दिपक होन, शशिकांत होन, संजय होन, बाळासाहेब  होन, भगवान होन, प्रल्हाद गोसावी, चंद्रकांत पागिरे, हरिभाऊ होन, राजेंद्र कासार, भरत थोरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते. याकामी  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  ग्रामसेविका पागिरे पी. एस यांनी काम पाहिले. त्यांना लिपीक अमर नेहे, शिपाई अनिल खपके  यांनी  सहकार्य  केले.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत