राहुरी तालुक्यातील 'या' गावात दरोडा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी तालुक्यातील 'या' गावात दरोडा

राहुरी (विशेष प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील वडनेर येथील राजेंद्र दिवे यांच्या घरांवर सहाजणांनी धाडसी दरोडा टाकण्याची घटना घडली. ही घटना बुधव...

राहुरी (विशेष प्रतिनिधी)



राहुरी तालुक्यातील वडनेर येथील राजेंद्र दिवे यांच्या घरांवर सहाजणांनी धाडसी दरोडा टाकण्याची घटना घडली. ही घटना बुधवारी (दि.२२) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. त्यानुसार सहा जणांविरोधात राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

राजेंद्र दादा दिवे (वय ५३, रा. वडणेर, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी पत्नी संगीता, मुलगा अक्षय व संजय, सुन राखी, बहीण कुसुम असे सर्व एकत्रित वडणेर येथे राहात आहे. मी ड्रायव्हर व शेती व्यवसाय करुन आमचे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. आमचे गावात राहणारे सारंगधर जाभुळकर यांच्यासोबत माझे एक महिन्यापुर्वी किरकोळ वाद झाला होता. त्या संदर्भात राहुरी पोलिसांत तक्रारी दाखल केलेली आहे.


दि. २१ मार्च रोजी मी स्वतः पत्नी व बहिण घरात जेवण करुन झोपलो होतो. त्यानंतर दि.२२ मार्चच्या मध्यरात्री घराचा दरवाजा लोटल्याचा आवाज आल्याने जागा झालो तेव्हा दरवाजातून सारंगधर जांभुळकर, सचिन येळे व सोमनाथ येळे यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या हातात चाकु व कुऱ्हाड होती. त्यावेळी सारंगधर जाभुळकर चाकुचा धाक दाखवत म्हणाला कि, तू तुझ्या कपाटाची चावी दे, मात्र त्याला चावी देणार नाही असे म्हणालो असता, त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पत्नी व बहिण जाग्या झाल्या. त्या दोघीही घाबरलेल्या अवस्थेत होत्या. यावेळी बहिणीला म्हणालो की, तू त्यांना चावी देवुन टाक. परंतु, जाभुळकर व येळे यांनी त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली.


मारहाणीच्या भीतीपोटी बहिणीने सारंगधर याच्याकडे चावी दिली. त्यावेळी सारंगधर म्हणाला कि, तुम्ही जर आरडाओरडा केला तर तुम्हाला संपून टाकीन असे म्हणुन धमकी दिली. तसेच सचिन येळे व सोमनाथ येळे हे चाकु व कुऱ्हाड घेवुन जवळ थांबले होते. त्यानंतर आमचे घरातील कपाट सारंगधरने चावीने उघडुन कपाटात ठेवलेले सामानाची उचकापाचक करून कपाटात ठेवलेले तीन हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम व साठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी मंगळसुत्र, सोन्याचे ठुशी व कर्णफुले तसेच शंभर रुपये किमतीचा स्टीलचा डबा असा एकुण 63,600 रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी चोरून पोबारा केला. यावेळी त्यांचा मी पाठलाग केला त्यावेळी आणखी अनोळखी तिघेजण असल्याचे निदर्शनास आले. त्यांनतर शेजारी राहात असलेले प्रदिप दिवे यांच्या घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार कथन केला.  


राजेंद्र दादा दिवे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सारंगधर जांभुळकर, सचिन येळे, सोमनाथ येळे (तिघे रा. वडनेर, ता.राहुरी), अनोळखी तीन जणांविरोधात कलम 395 नुसार दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा हे करीत आहेत.


सारंगधर जांभुळकर, सचिन येळे, सोमनाथ येळे यांच्याकडून राजेंद्र दिवे यांना अनेक दिवसापासून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. याबाबत दिवे यांनी राहुरी पोलिसात तक्रार दाखल करूनही राहुरी पोलिसांनी संबधीतांवर कारवाई केली नाही. त्यामुळे संबंधित आरोपीची मजल थेट घरी येऊन दरोडा टाकून मारहाण करण्यापर्यंत गेली. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत