राहुरी कारखाना; तनपुरे पितापुत्रांची कोंडी; मौन काय सांगतंय? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी कारखाना; तनपुरे पितापुत्रांची कोंडी; मौन काय सांगतंय?

  राहुरी(वेबटीम)  राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या डॉ. तनपुरे कारखान्यावर प्रशासक येताच राजकीय हालचालींना वेग आला आ...

 राहुरी(वेबटीम)



 राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या डॉ. तनपुरे कारखान्यावर प्रशासक येताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. यातून आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत, त्यामुळे निवडणूक झाली तर ती चुरशीची होईल, याचे संकेत आहेत. मात्र या सर्व घडामोडीत तनपुरे पिता- पुत्राची चांगलीच कोंडी झाली असून, निवडणूक लढलो, तर प्रवरेची नाराजी न परवडणारी आहे, शिवाय कारखाना ताब्यात आला तर सुरू कसा करायचा आणि नाही लढलो, तर कर्डिलेचा गट जसा विखेंकडे गेला, तसाच आपला गटही गेला तर...? या चिंतेमुळेच तनपुरे अजूनही या विषयावर मौन बाळगून असल्याची चर्चा आहे.             


 राहुरी कारखाना ही शेतकऱ्यांची, हजारो कामगारांची कामधेनू आहे. ती जपली पाहिजे, जगली पाहिजे, अशी सर्वांची वरवर तळमळ दिसली आहे. मात्र जो कोणी सत्तेवर येईल, त्याने लचकेच तोडल्याचे सर्वश्रुत आहे. कारखाना वाचविण्यापेक्षा सोन्याची अंडी देणाऱ्या संलग्न संस्थेत अनेकांनी रस दाखवल्याचेही लपून राहिले नाही. या सर्व कारणांमुळेच तालुक्यातील नेत्यांनी विश्वास गमावला व पाच वर्षांपूर्वी सभासदांनी हा कारखाना प्रवरेच्या ताब्यात दिला. त्यांनी शब्द दिल्या प्रमाणे कारखाना सुरूही केला, चालवलाही, मात्र कारखान्यावरील कर्जाचा डोंगर काही कमी होऊ शकला नाही, उलट तो वाढतच राहिल्याचे दिसत आहे. यातून कारखाना बंद पडला, कामगारांचे कुटुंब देशोधडीला लागले,  अशातच प्रशासक आले आणि  शेतकरी, कामगार पुन्हा नजरेआड जाताना दिसत आहे. सत्ताधारी पाच वर्षात कर्ज कमी करू शकले नाहीत, उलट  जमीन विक्री, मुरूम उतखनन, भंगार विक्री, डोनेशनबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपामुळे सत्ताधारी बदनाम होताना दिसत आहे. 


 अमृत धुमाळ, अरुण पाटील कडू, राजुभाऊ शेटे यांच्या लढ्याला शेतकरी काही प्रमाणात साथ देताना दिसत आहेत, मात्र आता माजी मंत्री तनपुरे हेच खरे सावध पवित्रेत वाटत आहेत. आगामी बाजार समिती, नगरपालिका आणि विधानसभा या ३ निवडणुका त्यांच्यासाठी महत्वाच्या असल्याचे बोलले जाते. त्यामुळे कारखान्यात डोके घालून नाहक राजकीय संकट ओढवून घ्यायचे ही त्यांची सध्यातरी मानसिकता दिसत नाही. 


उलट सहकारात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ते पुढे येऊ शकतात आणि चार- दोन कार्यकर्त्यांचे मुळा प्रवरा व कारखान्यात पुनर्वसन करू शकतात, अशी चर्चाही सुरू झाली आहे.



खरंतर, तनपुरे पिता पुत्रांनी ठरवलेच तर ते आपल्या वडील-आजोबांच्या नावाचा कारखाना पुन्हा पुनर्जीवित करू शकतात, याशिवाय माजी खासदार बापूसाहेब तनपुरे यांच्यामुळे कारखाना बंद पडल्याचा राजकीय  निष्क्रिययतेचा डाग पुसण्याची ही संधी समजली जात आहे. त्यामुळे  केवळ कार्यकर्त्यांना पुढे न करता त्यांना स्वतः पुढे यावे लागणार आहे. त्यासाठी तनपुरे हे धाडस दाखवून आता तरी विखेंविरोधातील मौन सोडणार का? याकडे तालुक्याचे लक्ष आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत